13 August 2020

News Flash

पाहा सलमान खान निर्मित ‘हीरो’चा ट्रेलर, सूरज पांचोली आणि अथिया शेट्टीचे पदार्पण

प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या 'सलमान खान फिल्म्स' (एसकेएफ) निर्मितीसंस्थेच्या 'हिरो' चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

| July 15, 2015 07:51 am

प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या ‘सलमान खान फिल्म्स’ (एसकेएफ) निर्मितीसंस्थेच्या ‘हिरो’ चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. १९८३ साली प्रदर्शित झालेले दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘हिरो’चे रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा आगमन होत आहे. मात्र, यावेळी या ‘हिरो’ला आधुनिक साज, दबंग खान सलमानची निर्मिती आणि नव्या चेहऱयांना संधी, असे वलय प्राप्त झाल्याने प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बुधवारी सलमानच्या हस्ते हिरो या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. रणबीर कपूर, सोनम कपूर, वरूण आणि आलिया यांच्यासारखीच आणखी दोन बॉलीवूडकरांची मुले मोठ्या निर्मितीसंस्थेमार्फत चंदेरी दुनियेत दमदार एण्ट्री घेणार आहेत. आदित्य पांचोली यांचा मुलगा सूरज पांचोली आणि अभिनेता सुनिल शेट्टी यांची कन्या अथिया शेट्टी हिरोच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहेत. ट्रेलरमधील काही क्षण १९८३ सालच्या ‘हीरो’ या मूळ चित्रपटाची आठवण करून देतात. खासकरून ट्रेलरच्या अखेरीस ‘प्यार करने वाले कभी डरते नही, जो डरते हे वो प्यार करते नही’ हे अथियाचे उद्गार चित्रपटाबाबतच्या रसिकांच्या अपेक्षा वाढवतात, तर सूरज पांचोलीचे अॅक्शन सिन्स उत्सुकता वाढवणारे आहेत. अॅक्शन, ड्रामा, प्यार आणि म्युझिक अशी सरमिसळ या ट्रेलरमधून पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2015 7:51 am

Web Title: salman khan introduces athiya shetty sooraj pancholi in hero watch trailer
टॅग Hero
Next Stories
1 अमजद खानच्या मुलाच्या पुस्तकाचे बिग बींच्या हस्ते प्रकाशन
2 माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत ‘एफटीआयआय’ नको
3 ‘बजरंगी भाईजान’मुळे माझ्यातला निरागसपणा परतेल…
Just Now!
X