News Flash

‘या’ चित्रपटातून मेहुण्याला लाँच करत आहे सलमान

ट्विटरवरून सलमानने दिली माहिती

सलमान खान, आयुष शर्मा

बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित करण्यासाठी सलमानचा मेहुणा आयुष शर्मा सज्ज झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सलमान आयुषला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याचं म्हटलं जात होतं. गुरुवारी सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचं नाव ‘लव्हरात्री’ असून आयुष यात मुख्य भूमिका साकारणार आहे.

‘सलमान खान फिल्म्स अंतर्गत पाचव्या प्रोजेक्टची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. ‘लव्हरात्री’ या चित्रपटातून आयुष शर्मा पदार्पण करत आहे. अभिराज मीनावाला या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून बाकीची माहिती लवकरच देईन,’ असं ट्विट सलमानने केलं. आयुष हा सलमानची बहीण अर्पिताचा पती आहे.

PHOTO : रिसेप्शन आमंत्रणासोबत विरुष्काने दिला खास संदेश

पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ‘लव्हरात्री’च्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी आयुष गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करत होता. दमदार पदार्पणसाठी त्याने नृत्य आणि अॅक्शनचेही धडे घेतले. आयुषसोबत प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री मौनी रॉयला मुख्य भुमिकेसाठी घेण्याचा सलमानचा विचार होता. मात्र आयुषला हा निर्णय काही आवडला नाही. त्यामुळे आता या चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

दिग्दर्शक म्हणून अभिराजचाही हा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी तो अली अब्बास जफर याच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचा. ‘सुलतान’च्यावेळी सलमान आणि अभिराजची भेट झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 3:09 pm

Web Title: salman khan introduces brother in law aayush sharma to bollywood loveratri
Next Stories
1 …म्हणून पाकिस्तानात ‘बॅन’ ‘टायगर जिंदा है’
2 रिसेप्शन आमंत्रणासोबत विरुष्काने दिला खास संदेश
3 सेलिब्रिटी लेखक : अविस्मरणीय अनुभव
Just Now!
X