News Flash

सलमानने कतरिनाला घातली होती लग्नाची मागणी; व्हिडीओ होतोय व्हायरल

सलमानच्या लग्नाच्या मागणीवर कतरिना म्हणाली...

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अद्याप अविवाहीत आहे. आजवर संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, लुलिया वंतुर यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत सलमानचे नाव जोडले गेले आहे. परंतु ५४ वर्षांचा भाईजान आजही मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणून मिरवतो. दरम्यान सलमानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तो कतरिना कैफला लग्नाची मागणी घालताना दिसतोय. कतरिनाने देखील या प्रश्नावर चकित करणारी प्रतिक्रिया दिली आहे.

अवश्य वाचा – सोनू सूद मागतोय ‘त्या’ चीनी लोकांची माहिती; जाणून घ्या काय आहे प्रकरण

हा व्हिडीओ पाहाच – महाभारत, रामायण खरंच घडलं होतं का?

हा थ्रोबॅक व्हिडीओ सलमानच्या इन्स्टाग्राम फॅन्स पेजवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान कतरिनाला विचारतोय, “माझं वय लग्न करण्यालायक झालं आहे. मला तू आवडतेस. माझ्याशी लग्न करशील का?” सलमानचा हा प्रश्न ऐकून कतरिना जोरजोरात हसू लागते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘पार्टनर’, ‘मैंने प्यार क्यों किया’, ‘युवराज’, ‘टाइगर जिंदा है’, ‘एक था टाइगर’ आणि ‘भारत’ या चित्रपटांमध्ये सलमान आणि कतरिना यांनी एकत्र काम केले आहे. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. कधीकाळी सलमान आणि कतरिना एकमेकांना डेट करत होते. परंतु रणबीर कपूरमुळे त्यांचे ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपनंतरही ‘भारत’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 11:55 am

Web Title: salman khan proposes katrina kaif for marriage mppg 94
Next Stories
1 “कियाराबाबत काय विचार करतोस?”; चाहत्याच्या प्रश्नावर सिद्धार्थ म्हणाला…
2 ‘काही हात सापडले, काही निसटले’; वडील मोहन गोखलेंसाठी सखीची भावूक पोस्ट
3 ‘श्रीगणेश’ फेम अभिनेते जगेश मुकाटी काळाच्या पडद्याआड
Just Now!
X