अभिनेता सलमान खानने नुकतेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढत असलेल्या तणावावर युद्ध हा पर्याय असू शकत नाही असे मत मांडले. युद्ध फक्त विनाश घडवून आणू शकतो. युद्धाची झळ दोन्ही देशांना लागते. कित्येक नागरिक मृत्युमुखी पडतात, अनेकांच्या डोक्यावरचं छत्र हरवतं, तर काहींच्या घरातला एकमेव कमवता माणूस जातो.

Father’s Day 2017: मी सईला पहाटे ३ वाजताही उठवतो- सागर कारंडे

आपला आगामी सिनेमा ट्युबलाइटच्या प्रमोशन दरम्यान, त्याने आपला राग राजकारणाऱ्यांवर काढत म्हटले की, जे नेते युद्धाचा आदेश देतात त्यांनाच सर्वात आधी बंदूक धरायला लावून सीमेवर पाठवले पाहिजे असंही सलमान यावेळी म्हणाला. सीमेवर उभं केल्यानंतर या नेत्यांचे हात पाय थरथर कापू लागतील आणि एकाच दिवसात युद्ध संपेल. दुसऱ्याच दिवशी हे सर्व नेते बोलून काही मार्ग निघतोय का यासाठी एकत्र बसतील. जगातील कोणत्याही प्रश्नावर बोलून मार्ग निघू शकतो असं सलमानचं ठाम मत आहे.

सलमान सध्या १९६१ च्या भारत- चीन युद्धावर आधारित ट्युबलाइट सिनेमाचे दणक्यात प्रमोशन करत आहे. त्याच्यासोबत अनेक ठिकाणी सोहेल खानही उपस्थित असतो. सोहेलनेही युद्धावर आपलं मत स्पष्ट करत म्हटले की, युद्ध ही एक नकारात्मक भावना आहे. युद्ध झालेलं कोणालाच आवडत नाही. पण तरीही राजकारणामुळे युद्ध लढली जातात.

हॉलिवूडमध्ये ‘द रॉक’ला मागे टाकत प्रियांका बनली नंबर एकची सेलिब्रिटी

सलमान पुढे म्हणाला की, ट्युबलाइट हा सिनेमा पूर्णपणे युद्धावर बेतलेला नाही. तर युद्धाची केवळ पार्श्वभूमी यात दाखवण्यात आली आहे. युद्ध कोणत्याही देशासाठी चांगले नसते असा सामाजिक संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे.