23 October 2019

News Flash

Video: सलमान गुणगुणतोय किशोर कुमारांचे गाणे

सलमान त्याच्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही. चित्रपटाचे शूटिंग करतानादेखील आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी तो खास वेळ काढतो.

सलमान खान

अभिनेता सलमान खानने आतापर्यंत अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. इंडस्ट्रीमध्ये आपली कला दाखवण्यासाठी झटणाऱ्या कलाकारांना सलमान कायमच पाठिंबा देतो. सलमान त्याच्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही. चित्रपटाचे शूटिंग करतानादेखील आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी तो खास वेळ काढतो. अनेकदा आपल्या चाहत्यांसोबतचे फोटो सलमान सोशल मीडियावर शेअर करत असतो.

नुकताच सलमानने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत इंडियन आयडॉलमधील स्पर्धक थुप्टेन सेरिंग दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला थुप्टेन एक कविता वाचत आहे. त्याने ‘प्रेम पुजारी’ या चित्रपटातील किशोर कुमार यांचे ‘फूलों के रंग से’ हे गाणेदेखील गायले आहे. सलमानदेखील हे गाणे गुणगुणताना दिसतोय.

View this post on Instagram

@thupten_the_solo_performer_889

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

View this post on Instagram

And this is literally happened

A post shared by Thupten The Solo Performer (@thupten_the_solo_performer_889) on

थुप्टेनने देखील त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून सलमानच्या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘भारत’च्या यशानंतर सलमान आता ‘दबंग ३’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित सलमान खानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published on July 12, 2019 12:33 pm

Web Title: salman khan sing song kishor kumar djj 97