21 January 2021

News Flash

सनाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

पाहा, सनाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो

बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉसची स्पर्धक सना खानने काही दिवसांपूर्वी इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. त्यानंतर सनाने मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी निकाह केला आहे. विशेष म्हणजे सनाने गुपचूपपणे केलेल्या निकाहमुळे अनेकांना धक्का बसला असून सध्या चाहत्यांमध्येच ही एकच चर्चा रंगली आहे. त्यातच आता सनाने तिच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सनाने निकाह झाल्यानंतर तिच्या मेहंदी सोहळ्यातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सना अत्यंत सुंदर दिसत असून तिने पारंपरिक कपडे परिधान केले आहेत. या फोटोमध्ये सना तिच्या हातावरची सुंदर मेहंदी दाखवत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayied Sana Khan (@sanakhaan21)

वाचा :  निकाहनंतर सना खानने केला नावात बदल; आता मिळाली ‘ही नवीन ओळख

दरम्यान, सनाने मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी निकाह केल्यानंतर सोशल मीडियावर तिचं नावदेखील बदललं आहे. सनाने सोशल मीडियावर तिचं नाव बदलून आता सय्यद सना खान असं केलं आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2020 4:54 pm

Web Title: sana khan shared her mehendi ceremony photos dcp98
Next Stories
1 मल्याळम भाषेतील ‘जलिकट्टू’ ऑस्करच्या शर्यतीत
2 ब्रीद विथ मी! शिबानीसाठी फरहानची खास पोस्ट
3 सलमाननं नाकारली २५० कोटींची ऑफर; हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होणार
Just Now!
X