21 January 2021

News Flash

बॉयफ्रेंडच्या अचानक मृत्यूनंतर संजय दत्तच्या मुलीची भावनिक पोस्ट

त्रिशालाचा बॉयफ्रेंड इटालियन होता

अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त गेल्या काही दिवसांपासून इटालियन बॉयफ्रेंडसह रिलेशनशीपमध्ये होती. २ जुलै रोजी तिच्या बॉयफ्रेंडचा अकस्मात मृत्य झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्रिशाला धक्काच बसला आहे. त्या दुखा:त त्रिशालाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

त्रिशालाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूची माहिती दिली. तिने या पोस्टमध्ये त्याचा फोटो शेअर केला आहे. ‘मला फार दुख: होत आहे. माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, माझा आधार झाल्याबद्दल आणि माझी काळजी घेण्यासाठी धन्यवाद. तु मला आयुष्यात जितका आनंद दिलास तितका आनंद मी कधीच अनुभवला नव्हता’ अशी भावुक पोस्ट त्रिशालाने लिहिली आहे.

 

त्रिशाला कधीच तिच्या बॉयफ्रेंड विषयी उघडपणे बोलली नव्हती. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवरुन तिचा बॉयफ्रेंड असल्याचा अनुमान लावण्यात आला होता. त्रिशालाने तिच्या कोणत्याच पोस्टमध्ये तिच्या बॉयफ्रेंडच्या नावाचा खुलासा केला नसला तरी तो इटालियन असल्याचे सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 3:43 pm

Web Title: sanjay datta daughter trisha datta boyfriends death post avb 95
Next Stories
1 BLOG: सुबोध भावे साकारणार आचार्य अत्रेंचा बायोपिक?
2 ‘तारक मेहता..’मध्ये दयाबेनच्या जागी या अभिनेत्रीची वर्णी?
3 हृतिक रोशनविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
Just Now!
X