आपल्या तीनही मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याला शाहरूख नेहमीच प्राधान्य देतो. आपल्या व्यस्त कामकाजातूनही किंग खान आपल्या मुलांसाठी वेळ काढतो. आपला आगामी चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनमध्ये सध्या किंग खान व्यस्त आहे. मात्र तरीही जुलै महिन्यात तो आपला मुलगा आर्यनला वेळ देणार आहे आणि त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे.

शाळेत फूटबॉल खेळताना आर्यनच्या नाकाचं हाड मोडलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असले तरी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावे लागणार असल्याचे सांगितले. यासाठी एसआरकेसुद्धा परदेशी जाणार आहे. ही शस्त्रक्रिया जुलै महिन्यात करण्यात येणार आहे.

वाचा : लंडनमध्ये बंदुकीचा धाक दाखवून ‘मिस साऊथ आफ्रिका’ डेमीच्या अपहरणाचा प्रयत्न

जुलैमध्ये प्रतिष्ठित आयफा पुरस्कार सोहळासुद्धा पार पडणार आहे. अशा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणे किंग खान शक्यतो टाळत नाही. मात्र या पुरस्कार सोहळ्याला न जाता शस्त्रक्रियेदरम्यान आपल्या मुलासोबत राहण्याचे शाहरूखने निवडले. वडिल आणि मुलांतील प्रेम जगात कुठेही गेलो तरी सारखेच. प्रत्येक पित्याला आपले मूल तितकेच खास, मग सेलिब्रिटीजही याला अपवाद नाहीत. त्यामुळे मुलगा आर्यनासाठी आपली अनेक महत्त्वाची कामे बाजूला सारून वेळ काढणारा शाहरूखही याला अपवाद ठरला नाही.

वाचा : पोट भरण्यासाठी नवाजुद्दीन कोथिंबीर विकायचा

नुकत्याच झालेल्या करण जोहरच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आर्यन खान दिसला होता. आर्यन सध्या युएसएमधील एका प्रतिष्ठित संस्थेत चित्रपट अभ्यासात पदवी घेत आहे. मुलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी शिक्षण पूर्ण करण्याबाबत शाहरूख नेहमीच आग्रही राहिला आहे.