News Flash

“भावा असे करु नकोस, NCB घरी येईल”, शाहिदचा व्हिडीओपाहून नेटकऱ्यांची भन्नाट प्रतिक्रिया

पाहा व्हिडीओ...

बॉलिवूड अभिनेता शाहिर कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तो सतत व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असतो. सध्या शाहिद त्याचा आगामी चित्रपट ‘जर्सी’चे चित्रीकरण करत आहे. दरम्यान त्याने एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकताच शाहिदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो गाडीमध्ये बसला असून गाणे ऐकत असल्याचे दिसत आहे. दरम्यान तो अचनाक विचित्र एक्सप्रेशन देतो. ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. हा व्हिडीओ शेअर करत त्याने त्याने ‘मूड’ असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

Mood.

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

शाहिदचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने तर ‘शाहिद भावा एनसीबी घरी येईल असे काही करु नकोस’ असे म्हटले आहे. तर काही यूजरने शाहिदची प्रशंसा करत हसण्याचे इमोजी वापरले आहेत.

लॉकडाउननंतर आता शाहिद पुन्हा त्याचा आगामी चित्रपट ‘जर्सी’चे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण डेहराडून येथे सुरु आहे.

‘जर्सी’ हा तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौथम तिन्नानूरी यांनी केले असून हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही तेच करत आहेत. शाहिदने या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले होते. हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 12:10 pm

Web Title: shahid kapoor shares funny video fans says dont do this ncb will come home avb 95
Next Stories
1 “भोजपुरी गाण्यांमधील अश्लिलता थांबवा”; रवी किशन यांची योगी आदित्यनाथ यांना विनंती
2 हक्काचं घर! असिम रियाजनं मुंबईत घेतला फ्लॅट
3 नेहा कक्करनंतर आदित्य नारायण अडकणार लग्न बंधनात
Just Now!
X