X
X

शरद पोंक्षे यांना ‘माझा पुरस्कार’

READ IN APP

मला ऑस्करपेक्षाही मोठा पुरस्कार मिळाला असून याचा मला आनंद आहे.

 

कला, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्यातर्फे दिला जाणारा ‘माझा पुरस्कार’ अभिनेते शरद पोंक्षे यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘माझा पुरस्काराचे’ हे बारावे वर्ष असून आतापर्यंत श्रेया बुगडे, मोहन जोशी, डॉ. नीलेश साबळे, सुबोध भावे यांच्यासह अनेक कलाकारांना देण्यात आला आहे.

कर्क रोगासारख्या दुर्धर आजाराशी सामना करत ‘हिमालयाची सावली’ आणि ‘अग्निहोत्र  २’ या नाटक आणि मालिकेद्वारे पदार्पण करणाऱ्या अभिनेते शरद पोक्षे यांना मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल माझा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘मला ऑस्करपेक्षाही मोठा पुरस्कार मिळाला असून याचा मला आनंद आहे. कलाकारांच्या उणिवांवर बोट ठेवून स्पष्ट शब्दांत सांगणाऱ्या अशोक मुळ्येंचा माझा पुरस्कार माझ्या रंगभूमीच्या सेवेची पावती आहे’, असे मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

24
X