News Flash

श्रद्धा कपूरने स्विकारलं बाहुबलीचं चॅलेंज; फोटो होतोय व्हायरल…

चॅलेंज दिल्याबद्दल श्रद्धा कपूरने मानले अभिनेता प्रभासचे आभार

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून की कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती चक्क दाक्षिणात्य अभिनेता प्रभासमुळे चर्चेत आहे. प्रभासने दिलेलं चॅलेंज तिने स्विकारलं आहे. शिवाय फोटो पोस्ट करुन या आव्हानासाठी तिने प्रभासचे आभार देखील मानले आहेत.

विकासाच्या नावाखाली गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर निसर्गाची झाली आहे. त्यामुळे जंगलांच्या संरक्षणासाठी प्रभासने स्वत: पुढे येत हैदराबादमधील एक हजार ६५० एकर वनक्षेत्र दत्तक घेतलं. लक्षवेधी बाब म्हणजे तो केवळ एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने आपल्या चाहत्यांना ‘ग्रीन इंडिया चॅलेंज’ दिलं. या चॅलेंजद्वारे त्याने निसर्गाचं संरक्षण करण्याची विनंती केली. त्याचं हे चॅलेंज श्रद्धा कपूरने स्विकारलं आहे.

तिने रोपटं लावतानाचा एक फोटो पोस्ट करुन प्रभासचे आभार मानले आहेत. “ग्रीन इंडिया चॅलेंज दिल्याबद्दल धन्यवाद प्रभास. मी तुझ्या चॅलेंजचा स्विकार केला. हे बघ मी एक रोपटं लावलं आहे.” अशा आशयाची कॉमेंट तिने या फोटोवर लिहिली आहे. श्रद्धाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यापूर्वी राम चरण आणि राणा दग्गुबत्ती यांनी देखील प्रभासचं हे चॅलेंज स्विकारलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 5:31 pm

Web Title: shraddha kapoor green india challenge prabhas mppg 94
Next Stories
1 ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये साजरा होणार अप्पांचा ७५वा वाढदिवस
2 चुकवू नयेत अशा अ‍ॅमेझॉन प्राइमवरील टॉप ५ वेब सीरिज
3 ‘बिग बॉस१४’मध्ये सहभागी होण्यावर कॅरीमिनाटी म्हणाला..
Just Now!
X