News Flash

Photo : साहोच्या सेटवरील भुक्कड श्रद्धाचा ‘हा’ फोटो पाहिलात का ?

'साहो'च्या निमित्ताने अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि प्रभास एकत्र काम करणार आहेत.

Photo : साहोच्या सेटवरील भुक्कड श्रद्धाचा ‘हा’ फोटो पाहिलात का ?
श्रद्धा कपूर

‘बाहुबली’फेम अभिनेता प्रभास त्याच्या आगामी साहो चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण मोठ्या उत्साहात सुरु झालं असून या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि प्रभास एकत्र काम करणार आहेत.श्रद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटववरुन ‘साहो’ सेटवरचे बरेच फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर हे फोटो चर्चेतही येत असतात. त्यातच तिने आता आणखी एक नवा फोटो शेअर केला. या फोटोत श्रद्धाच्या पुढे जेवणाचे बरेचसे डबे दिसून येत आहे.

हैदराबादमधील रामोजी राव सिटीत सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून श्रद्धाने तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रद्धाच्या समोर जेवणाचे तब्बल २३ डबे असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या फोटोत श्रद्धा एकटीच दिसून येत आहे. श्रद्धाप्रमाणेच अभिनेता प्रभासदेखील चांगलाच खवय्या आहे. मात्र या फोटोमध्ये श्रद्धा एकटीच आहे. त्यामुळे प्रभासची नजर चूकवुन श्रद्धा एकटीनेच या जेवणावर ताव मारल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, साहो हा चित्रपट हिंदीप्रमाणेच तेलगू, तामिळ आणि रिलीज होणार आहे. अॅक्शन थ्रिलर असलेला ‘साहो’मध्ये प्रभास आणि श्रद्धाव्यतिरिक्त अरुण विजय आणि नील नितीन मुकेश यांच्याही भूमिका आहेत. ‘रन राजा रन’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजीत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 1:34 pm

Web Title: shraddha kapoor is a foodie this pic is proof
Next Stories
1 गीताला पहिल्यांदा पोस्टरवर पाहिलं, हरभजन सांगतोय ‘प्यारवाली लव्हस्टोरी’
2 राखी सावंतचा होणारा नवरा दीपक कलाल आहे तरी कोण?
3 आयुषमानच्या पत्नीला पुन्हा कॅन्सरचं निदान
Just Now!
X