कमी कालावधीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या ‘स्त्री’ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. विशेष म्हणजे श्रद्धाचा हा चित्रपट तिच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटामुळे श्रद्धाच्या लोकप्रियतेतही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

‘आशिकी २’, ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘बागी’, ‘रॉक ऑन २’, ‘हसीना पारकर’, ‘ओके जानू’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी श्रद्धा यापूर्वी इन्टाग्रामवर टॉप ट्रेंडिंग अभिनेत्री ठरली होती. ‘स्त्री’मुळेच तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली होती. आता तिचा ‘स्त्री’ हा चित्रपट तिच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

श्रद्धा ‘एक व्हिलेन’ आणि ‘एबीसीडी २’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले होते. त्यानंतर आता या चित्रपटांमध्ये स्त्री या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. सलग १४ आठवडे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखविला गेला. मात्र तरीदेखील त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही.

दरम्यान, विविध भूमिका प्राधान्य देणारी श्रद्धा लवकरच ‘साहो’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता प्रभास स्क्रिन शेअर करणार आहे. तर या चित्रपटानंतर ती बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्येही झळकणार आहे.