16 July 2020

News Flash

मराठी अभिनेत्रीचा पतीसोबत बोल्ड अवतार; फोटो होतोय व्हायरल

या मराठी अभिनेत्रीनं आपला खासगी फोटो सोशल मीडियावर केला पोस्ट

सर्वसाधारणपणे हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री आपल्या मादक अंदाजासाठी ओळखल्या जातात. परंतु गेल्या काही काळात मराठी अभिनेत्रींनी देखील आपल्या स्टाईलिश अंदाजाने खळबळ माजवली आहे. सई ताम्हणकर, मानसी नाईक, नेहा पेंडसे, स्मिता गोंदकर अशा अनेक अभिनेत्री आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करताना दिसत आहे. या यादीत आता श्वेता साळवे हिचे देखील नाव जोडले गेले आहे. तिने तर चक्क आपल्या पतीसोबत किसिंग करताना फोटो पोस्ट केला आहे.

अवश्य पाहा – मनोरंजनसृष्टीने सोडला सुटकेचा निश्वास; मुख्यमंत्र्यांनी मागण्यांसंदर्भात केल्या सूचना

 

View this post on Instagram

 

Make Love Not War Kids !! . Lots of introspection in the last few days .. internal external .. What goes around can’t be controlled or maybe to a certain extent yes , but your internal turmoil is in your hands and your minds. . – Lewis Carroll, Alice in Wonderland. . Your visions will become clear only when you can look into your own heart. Who looks outside, dreams; who looks inside, awakes . But if these years have taught me anything it is this: you can never run away. Not ever. The only way out is IN ! You be the Change within . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #bethechangeyouwanttosee #quarantinedbutsmiling #selfisolation #selfintrospection #makepeace #makelove #makelovenotwar #spreadkindness #bekind #besensitive #instagram #wisdom #growth #peace #instalove #aliceinwonderland #stillswithstories #bethechange #loveintimesofcorona #love #myboo #justus #LockdownLove #covidlovers #inthetimeofcorona

A post shared by Shveta Salve (@shveshve) on

अवश्य पाहा – Video: फोनवर बोलण्यात गुंग असणाऱ्या गायकाच्या हातात गर्लफ्रेंडने ठेवला साप

श्वेताने इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती पती हरमितचे चुंबन घेताना दिसत आहे. श्वेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच आपले बोल्ड फोटोज पोस्ट करत असते. या पार्श्वभूमीवर तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे.

३५ वर्षीय श्वेता एक टीव्ही अभिनेत्री आहे. १९९८साली ‘हिप हिप हुर्रे’ या मालिकेतून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर ‘लेफ्ट राईट लेफ्ट’, ‘किटी पार्टी’, ‘कहानी किसी रोज’, ‘कित्तू सब जानती है’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केले. ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेतमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत तिने अरुंधती ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ‘झलक दिखलाजा’ या रिअॅलिटी शोमुळे श्वेताच्या जबरदस्त डान्सची देखील चर्चा होऊ लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 12:17 pm

Web Title: shweta salve bold photo viral with her husband mppg 94
Next Stories
1 नोटाबंदीवर अनुराग कश्यपचा चित्रपट; अमृता सुभाष, उपेंद्र लिमये महत्त्वपूर्ण भूमिकेत
2 अनुष्काचा ‘पाताल लोक’ वादाच्या भोवऱ्यात; बजावली कायदेशीर नोटीस
3 लॉकडाउनमध्ये ‘लॉ ऑफ लव्ह’; पोस्टरचं डिजिटल अनावरण
Just Now!
X