प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीवर आर्थिक फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. कोचिंग क्लासमध्ये अभिनय शिकवणाऱ्या राजेश पाण्डेय नामक एका शिक्षकाचे तब्बल ५२ हजार रुपये तिने थकवले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून हा व्यक्ती तिच्याकडे पैसे मागत आहे. परंतु श्वेताने त्याला अद्याप पैसे दिलेले नाही. परिणामी संतापलेल्या राजेशने आता श्वेताविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – आली लहर केला कहर; अभिनेत्रीने वाढदिवशी केला ११ हजार फुटांवरुन स्टंट

राजेश २०१२ पासून जवळपास सहा वर्ष श्वेताने सुरु केलेल्या अॅक्टिंग क्लासमध्ये अभिनय शिकवण्याचे काम करत होता. १५ विद्यार्थांना तो दररोज अभिनय शिकवायचा. परंतु त्याच्या पगारातील ५२ हजार रुपये श्वेताने थकवल्याचा आरोप त्याने केला आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत राजेशने श्वेताबाबत संताप व्यक्त केला.

सर्वाधिक वाचकपसंती – ‘ती माझ्या मांडीवर बसली होती’; अभिनेत्याच्या कॉमेंटवर शेफाली संतापली, म्हणाली…

“करोनामुळे मी आर्थिक संकटात सापडलो आहे. माझ्याकडे सध्या कुठलंच काम नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मी श्वेताकडे माझा उर्वरीत पगार मागत आहे. परंतु ती माझ्या विनंतीकडे सातत्याने दुर्लक्ष करतेय. शिवाय मी मेसेज करुन तिच्याकडे पैशांची मागणी करु नये म्हणून तिनं मला वॉट्सअॅपवर देखील ब्लॉक केलं आहे. कृपया श्वेताने माझ्या मेहनतीचे पैसे मला द्यावे अन्यथा या प्रकरणी मला कायदेशीर कारवाई करावी लागेल.” असे आरोप राजेशने श्वेतावर केले आहेत. दरम्यान या आरोपांवर श्वेता तिवारीने अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.