News Flash

‘स्लमडॉग मिलेनिअर’फेम अभिनेत्याने केला लैंगिक अत्याचाराच्या आरोपवर खुलासा

१३ फेब्रुवारी रोजी मधुरने एक्स गर्लफ्रेंडच्या घरी जात मारहाण केल्याचे तक्रारीमध्ये म्हटलं होतं

काही दिवसांपूर्वी ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता मधुर मित्तलविरोधात लैंगिक अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंबईतील खार पोलीस ठाण्यात त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्याविरोधात ही तक्रार दाखल केली होती. १३ फेब्रुवारी रोजी मधुरने एक्स गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन तिला मारहाण केल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले होते. आता मधुरने त्याच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपवर खुलासा केला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्याने बॉम्बे टाइम्सशी बोलताना सांगितलं की, हे सर्व खोटं आहे आणि या सर्व गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत आहे. तसेच अनेक कास्टिंग दिग्दर्शकांनी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिल्यामुळे या सर्व गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होते आहे.

‘माझ्या बद्दल ज्या चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या आहेत त्याबद्दल विचार करुन डिसटर्ब व्हायला होते. माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काही स्टोरीज व्हॉट्सअपवरुन पसवरल्या जात आहेत आणि त्या गेल्या आठवड्यापासून अनेक ग्रूपमध्ये फॉरवर्ड केल्या जात आहेत. त्यामुळे कास्टिंग दिग्दर्शक माझ्यासोबत काम करण्यास नकार देत आहेत. वयाच्या ७ व्या वर्षांपासून माझ्या कुटुंबातील मी एकमेव कमावता व्यक्ती आहे आणि माझ्याविषयी पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्यांमुळे त्याचा परिणाम माझ्यासोबत माझ्या कुटुंबावरही होत आहे’ असे त्याने म्हटले आहे.

मधुर आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची भेट डिसेंबर २०२० मध्ये झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच मधुरने मद्याच्या नशेत तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी या दोघांनी ब्रेकअप केला होता. मात्र, त्यानंतर १३ फेब्रुवारीला मधुरने घरात घुसून तिला मारहाण केली, असं तरुणीच्या वकिलांनी सांगितलं. मधुर प्रचंड रागात होता त्यामुळे कोणाशीही न बोलता तो थेट तिच्या घरात शिरला आणि त्याने तिची मान पकडून तिच्या कानशिलात लगावल्या. तसंच तिचे केस, कान ओढले. इतकंच नाही तर तिच्या डोळ्यांवर त्याने मुक्का मारला, असं दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 11:31 am

Web Title: slumdog millionaire actor madhur mittal responds to sexual assault allegations avb 95
Next Stories
1 श्रेयाने शेअर केली गुड न्यूज, बेबी बंपसोबत फोटो केला शेअर
2 दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच आला करीना-सैफचा फोटो समोर
3 अनुराग-तापसीची पुण्यात रात्री उशिरापर्यंत चौकशी; तीन दिवस चालणार झाडाझडती?
Just Now!
X