आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमुळे अभिनेत्री स्मिता तांबे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनयानंतर स्मिताने तिचा मोर्चा निर्मिती क्षेत्राकडे वळविला आहे. स्मिता लवकरच महिला सशक्तीकरणावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या ‘सावट’ या चित्रपटाची निर्मिती ‘निरक्ष फिल्म्स’ आणि ‘लेटरल वर्क्स प्रा लि.’ सोबतच स्मिता तांबेचे ‘रिंगींग रेन’ प्रॉडक्शन हाऊस करते आहे.

“सावटच्या निर्मितीसोबतच स्मिता या चित्रपटात अभिनयही करणार आहे. स्मिता इन्स्पेक्टर आदिती देशमुखची व्यक्तिरेखा साकारणार आहे. “उंबरठा आणि ‘जैत रे जैत’च्या स्मिता पाटील यांच्या भूमिका, ‘एक होता विदुषक’ सिनेमातली मधु कांबीकरांची भूमिका, स्मिता तळवलकरांची ‘चौकट राजा’मधली भूमिका, ‘उत्तरायण’मधली नीना कुलकर्णींची भूमिका या आणि अशा सशक्त स्त्री व्यक्तिरेखांनी कायम माझ्या मनावर गारूड केलंय. म्हणूनच असावं कदाचित मला अभिनय क्षेत्रात नेहमीच सशक्त महिलांच्याच भूमिका आकर्षित करत राहिल्यात. सीबीआय ऑफिसर आदिती देशमुखची भूमिकाही अशीच सशक्त, हुशार पोलीस अधिका-याची आहे”, असं स्मिताने सांगितलं.

पहिल्यांदाच निर्मिती करण्याविषयी स्मिता म्हणते,सौरभ फिल्म घेऊन आला तेव्हा मला चित्रपटाची कथा एवढी आवडली की, मी चित्रपटात काम करण्यासोबतच याची निर्मिती करायचं ठरवलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रिंगीग रेन’ आणि ‘निरक्ष फिल्म’च्या सहयोगाने ‘लेटरल वर्क्स प्रा.लि.’प्रस्तुत, स्मिता तांबे, हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित, सौरभ सिन्हा दिग्दर्शित ‘सावट’ चित्रपटातश्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.