करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. जगातील लाखो कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या या विषाणूबाबत खोट्या बातम्याही तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. अशीच एक अफवा गेल्या काही दिवसांत चर्चेत होती. म्हणे पाळीव प्राण्यांमुळे देखील करोना विषाणूची लागण होते. खरं तर याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती वैद्यकिय तज्ज्ञांमार्फत जाहीक केली गेलेली नाही. मात्र या खोट्या माहितीवर विश्वास ठेवून जगभरातील अनेक लोकांनी आपले पाळीव प्राणी घराबाहेर सोडून दिले. अशा लोकांवर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने संताप व्यक्त केला आहे.

अवश्य पाहा – आता घरबसल्या तयार करा मास्क; अभिनेत्याने सांगितली सोपी पद्धत

अवश्य पाहा – शक्तिमानची प्रेयसी सध्या काय करते?

काय म्हणाली सोनाक्षी?

मी असं ऐकलं आहे की लोक आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना सोडून देत आहेत. कारण ते करोना विषाणू पसरवतात असं त्यांना कोणीतरी सांगितलं. अशा लोकांसाठी माझ्याकडे एक बातमी आहे. तुम्ही मुर्ख आहात. काही सोडायचेच असेल तर तुम्ही आपलं अज्ञान आणि अमानुषपणा सोडा. अशा आशयाचं ट्विट सोनाक्षीनं केलं आहे.

सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी करोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला मात्र सोनाक्षीने अशी कुठंलीही मदत अद्याप जाहीर केली नाही. त्यामुळे तिच्यावर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोनाक्षीच्या या ट्विटने देखील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही जणांनी या ट्विटसाठी देखील तिच्यावर टीका केली आहे.