२०१५ मध्ये पृथ्वीच्या संरक्षणार्थ राबवण्यात आलेल्या एका उपक्रमासाठी सोनम अँग्री बर्ड बनली होती. त्यामुळे सोनमसाठी स्टाइल आयकॉन सोनमसाठी ही काही नवीन गोष्ट नाही. पण, स्वतःचे डिजिटल स्टिकर असणारी सोनम कपूर ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरल्यामुळे सध्या तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोनमने आतापर्यंत साकारलेल्या विविध भूमिकांच्या रुपात हे डिजिटल स्टिकर बनवण्यात आले आहेत. असे हे बहुरंगी आणि बहुढंगी डिजिटल स्टिकर लवकरच प्रदर्शित केले जाणार असून सोनमच्याच सिग्नेचर अॅपवर ते उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सोनम ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे जिचे स्वतःचे अॅप लॉन्च झाले आहे.

soka-2

soka-3

soka

सोनम आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच सोशल मीडियावर जोडलेली असते. इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारखे नेटवर्किंग साइटवर ती फार सक्रीयही असते. या डिजिटल स्टिकरची प्रेरणा ‘आय हेट लव स्टोरी’, ‘आयशा’, ‘नीरजा’, ‘डॉली की डोली’ आणि ‘खूबसूरत’ या सिनेमांतील भूमिकांपासून घेण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोनमने अगदी विचारपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात खेचत त्यांना त्यांच्याच ट्विटची आठवण करून दिली होती. सोनम कपूरने नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. या ट्विटमध्ये मोदींनी लिहिलेले की, कलेसाठी कोणतीही हद्द किंवा मर्यादा नसाव्यात. या ट्विटचा फोटो शेअर करत सोनमने लिहिले की, सर, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते….

प्रजासत्ताक दिन होऊन काही दिवस उलटले नाहीत तोवर आमच्या इंडस्ट्रीला कामात व्यक्त होताना असा पाणउतारा सहन करावा लागत असेल तर हे खरंच खूप निराशाजनक आहे. कृपया आमच्यासाठी उभे राहा. सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या साँवरिया सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.