अभिनेता रजनीकांत यांनी ३१ डिसेंबरला राजकारणात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. चेन्नईतील श्री राघवेंद्र मंडपम् सभागृहात चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांनी या निर्णयाची घोषणा केली. ही महत्त्वाची घोषणा केल्यानंतर उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत एक हस्तमुद्रा केली. त्यांच्या या हस्तमुद्रेने अनेकांचेच लक्ष वेधले. मुख्य म्हणजे हीच हस्तमुद्रा त्यांच्या पक्षाचे चिन्हं असू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यानंकर रजनीकांत यांनी स्वत:ची वेबसाइटही सुरु केली. विविध ठिकाणी असलेल्या चाहत्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी ही वेबसाइट सुरु केली आहे. “www.rajinimandram.org” या वेबसाइटवरही हीच हस्तमुद्रा पाहायला मिळत आहे. कमळातून वर येणारी ही हस्तमुद्रा त्याभोवती वर्तुळाकारात असणारे साप असे या चिन्हाचे स्वरुप आहे. अंगठ्याला जोडून मध्यमा आणि अनामिका ही हाताची बोटे आतल्या बाजूला असून, तर्जनी आणि करंगळी सरळ ठेवत ही हस्तमुद्रा साकारण्यात आली आहे.

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

वाचा : ‘टायगर जिंदा है’चा असाही एक विक्रम, आमिरच्या ‘३ इडियट्स’ला टाकले मागे

ही मुद्रा आणखी एका कारणामुळे लक्ष वेधतेय, कारण २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाबा’ या चित्रपटातूनही ही हस्तमुद्रा पाहायला मिळाली होती. या चित्रपटाला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. पण, रजनीकांत यांची ती हस्तमुद्रा त्यांच्या चाहत्यांमध्ये बरीच लोकप्रिय झाली. या हस्तमुद्रेची एकंदर लोकप्रियता पाहता येत्या काळात ‘थलैवा’च्या राजकीय पक्षाचे चिन्हं म्हणून त्याचा वापर केला गेला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे वृत्त ‘इंडियन एक्प्रेस’ने प्रसिद्ध केले आहे.

अध्यात्माकडे जास्त ओढ असणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांचे गुरु श्री गुरु बाबाजी म्हणजेच महाअवतार बाबा यांचे नावही या मुद्रेमुळे प्रकाशझोतात आले आहे. अध्यात्म आणि योग या दोन्ही गोष्टींचा मेळ या हस्तमुद्रेतून साकारण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. शरीर, बुद्धी आणि वाणीच्या शुद्धतेचं प्रतीक म्हणून यात कमळाचा वापर करण्यात आला आहे, तर वर्तुळाकारात असणारा साप हा पुनर्जन्म, अमरत्व आणि बदलाचं प्रतीक आहे. ज्या हस्तमुद्रेमुळे रजनीकांत यांच्या राजकीय पक्षाविषयीचे कुतूहल आणखीनच वाढले आहे.