07 March 2021

News Flash

“मी आणखी तीनच वर्ष जगेन”; ‘स्पायडरमॅन’मधील अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

स्पायडरमॅनमधील 'या' अभिनेत्याला झालाय कॅन्सर

‘रॉबर्ट अल्टमन’, ‘जॅक बेनी’, ‘जिम डेव्हिस’, इरफान खान यांसारख्या जगभरातील अनेक कलाकारांना कर्करोगामुळे आपले प्राण गमावले आहेत. या यादीत आता आता लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता डॅनी हिक्स यांचे देखील नाव जोडले जाण्याची भीती चाहत्यांनी व्यक्त केली आहे. डॅनी हिक्स गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाने ग्रासले आहेत. त्यांचा कॅन्सर आता चौथ्या स्टेजला पोहोचला आहे. त्यांच्याकडे आता केवळ तीनच वर्ष आहेत. ही दु:खद बातमी स्वत: डॅनी यांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली.

‘इव्हिल डेड’, ‘स्पायडरमॅन’, ‘माय नेम इज ब्रूस’, ‘डार्कमॅन’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचे प्रदर्शक करणारे डॅनी हिक्स हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. डॅनी केवळ ६८ वर्षांचे आहेत. मात्र कर्करोगामुळे त्यांना अभिनयातून निवृत्ती घ्यावी लागली. त्यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्वत:ची सध्य परिस्थिती चाहत्यांना सांगितली आहे.

“गेल्या अनेक वर्षांपासून मी कर्करोगामुळे त्रस्त आहे. त्यामुळे तुम्हाला मी भेटू शकत नाही. माझा कर्करोग आता चौथ्या स्थरावर पोहोचला आहे. उपचार सुरु आहेत पण शरीर साथ देत नाही. माझ्याकडे आता फारसा वेळ उरलेला नाही. जास्तीत जास्त तीन वर्ष आहेत. माझ्या संपूर्ण कारिअरमध्ये मी तुमचे मनोरंजन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा.” अशा आशयाची पोस्ट डॅनी यांनी केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांना कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 2:37 pm

Web Title: spiderman actor danny hicks reveals stage 4 cancer diagnosis mppg 94
Next Stories
1 तोंडात वांगं लटकवून भारतीची लाइव्ह कॉमेंट्री: व्हिडिओ झाला व्हायरल
2 नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार करण जोहरचा ‘गुंजन सक्सेना’
3 खोल समुद्रात पोहतानाचा कतरिनाचा व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X