News Flash

‘स्प्लिट्सविला’च्या विजेत्याला झाली करोनाची लागण

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने अभिनेत्यावर घरातच उपचार सुरु

करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान अभिनेता श्रेय मित्तल याला करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

अवश्य पाहा – नरेंद्र मोदींचं अकाउंट हॅक करणारा ‘जॉन विक’ कोण आहे?

एमटीव्ही स्प्लिट्सविला या शोमधूम नावारुपास आलेल्या श्रेयने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. “नमस्कार, माझा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मला करोनाची लक्षणं दिसत होती. सध्या मी १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईनमध्ये आहे. घरातच माझ्यावर उपचार सुरु आहेत. करोनाची लागण तुम्हाला कधीही कुठेही होऊ शकते त्यामुळे स्वच्छता राखा आणि स्वत:ची काळजी घ्या.” अशा आशयाची पोस्ट लिहून श्रेयने आपल्या चाहत्यांना करोनापासून सावधान केलं आहे.

अवश्य पाहा – ड्रग्स प्रकरणात क्राईम ब्रँचने अभिनेत्रीला बजावलं समन्स

 

View this post on Instagram

 

Stay safe and keep your loved ones safe

A post shared by shrey mittal (@iamshreymittal) on

करोनामुक्त होण्याचे प्रमाण ७७ टक्के

भारतात दैनंदिन करोना रुग्णवाढीचा आकडा ७० हजारांहून अधिक आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ७८ हजार ३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली. देशभरात रुग्णसंख्या ३७ लाख ६९ हजार ५२३ वर पोहोचली. मृत्यूची संख्याही वाढत असून ती ६६ हजार ३३३ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १,०४५ रुग्णांचा मृत्यू झाला.

करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्येतही वाढ होत असून सलग सहाव्या दिवशीही ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. १२ राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय सरासरी ७६.९८ टक्के आहे. करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता २९ लाख १ हजार ९०८ झाली असून ती उपचाराधीन रुग्णांपेक्षा २० लाखांहून अधिक आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये १० लाख रुग्ण बरे झाले. त्याआधी २२ दिवसांमध्ये ही संख्या गाठली गेली होती. महाराष्ट्र व तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये मिळून ३० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये ६२ हजार २६ रुग्ण करोनामुक्त झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 2:02 pm

Web Title: splitsvilla 12 winner shrey mittal tests positive for coronavirus mppg 94
Next Stories
1 …कंगनाचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही; शिवसेना आमदाराचा इशारा
2 ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबवून दाखवा – कंगना रणौत
3 “ड्रग्स घेतल्याशिवाय पार्टी संपत नाही”; अभिनेत्रीने सांगितलं सिनेसृष्टीचं डार्क सिक्रेट
Just Now!
X