News Flash

सुहास जोशींचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

'ललित २०५' मालिकेत साकारणार मुख्य भूमिका

सुहास जोशी

अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांतून आपल्या अभिनयानं स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘ललित २०५’ या नव्या मालिकेत त्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

स्टार प्रवाहची प्रत्येक मालिका काही ना काही वेगळेपण घेऊन येते. ‘ललित २०५’ ही मालिका एकत्रित कुटुंबावर आधारित आहे. सध्याच्या काळात असं एकत्र कुटुंब अभावानेच पाहायला मिळतं. आजीचा सहवास तर विरळ होत चाललाय. ‘ललित २०५’ मधून नात्यांमधला हरवलेला संवाद नव्याने शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सुहास जोशी या मालिकेत आजीच्या भूमिकेत दिसतील.

Bigg Boss Marathi : मेघाला का मानलं जातं विजेतेपदाची प्रमुख दावेदार?

स्टार प्रवाहनं कायमच मालिकांमध्ये जपलेलं वेगळेपण या नव्या मालिकेतही पहायला मिळेल, यात काहीच शंका नाही. ६ ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू होत असून रात्री ८.३० वाजता ‘ललित २०५’ तुमच्या भेटीला येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 11:04 am

Web Title: suhas joshi returns on small screen will play lead role in lalit 205 marathi serial
Next Stories
1 Bigg Boss Marathi : मेघाला का मानलं जातं विजेतेपदाची प्रमुख दावेदार?
2 फ्लॅशबॅक : गोष्ट ओळखीची वाटते का बघा…
3 पुष्पक चित्रपट झळकणार आता छोट्या पडद्यावर
Just Now!
X