03 March 2021

News Flash

Video : सुजय डहाकेच्या ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’चा टीझर प्रदर्शित

या सिरीजमध्ये मिताली मयेकरदेखील झळकणार आहे.

सेक्स, ड्रग्स किंवा मग थिएटर

महाविद्यालयीन जीवन म्हटलं की स्वच्छंदी, जीवनाचा मनमुराद आनंद घेऊन जगण्याचे दिवस. याच दिवसांमध्ये तरुणांना सगळ्यात जास्त आकर्षण असतं ते म्हणजे सेक्स, ड्रग्स किंवा मग थिएटरचं. मात्र या सगळ्यांची एकत्र किक बसली की नक्की काय होतं हे सांगणारी सुजय डहाके यांची नवी वेबसिरीज ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसिरीजचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

मराठी कलाविश्वातही गेल्या काही वर्षांपासून उत्तम आशयावर आधारित वेबसिरीजची निर्मिती होताना दिसत आहे. या सिरीजच्या माध्यमातून अनेक बोल्ड विषय सादर केले जात आहेत. यातलीच ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ ही नवी वेबसिरीज आहे. सहा महाविद्यालयीन तरुणांच्या मैत्रीतून उलगडत जाणारी कथा या सिरीजमध्ये पाहायला मिळेल.

शालवा किंजवडकर, मिताली मयेकर, नयना मुके, आदिश वैद्य, सुयश झाझुरके, अभिषेक देशमुख, सुजय डहाकेआणि सुनील बर्वे ही कलाकार मंडळी या सिरीजमध्ये मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत.

येत्या ५ मार्चपासून झी फाईव्ह या अॅप वर ही वेबसिरीज सुरू होणार असून ‘डेट विथ सई’ नंतर या वेबसीरीजला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 9:11 am

Web Title: sujay dahake sex drugs and theater marathi webseries teaser
Next Stories
1 पुलवामा हल्ला ही माझी वैयक्तिक हानी – विकी कौशल
2 ‘भारत’च्या चित्रिकरणादरम्यान कतरिनाला दुखापत
3 साजिद, नानांवरील आरोपांचा ‘हाऊसफुल ४’ वर परिणाम नाही- क्रिती
Just Now!
X