News Flash

Video : सलमानपाठोपाठ कतरिनाही झाली ‘डॉक्टर गुलाटी’साठी फोटोग्राफर

सध्या सुनीलची चर्चा असून नुकताच त्याचा सेटवरील नवा फोटो व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान आगामी ‘भारत’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण माल्टा येथे होणार असल्यामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथम छोट्या पडद्यावरील विनोदवीर सुनील ग्रोवर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे सध्या सुनीलची चर्चा असून नुकताच त्याचा सेटवरील नवा फोटो व्हायरल झाला आहे.

काही दिवसापूर्वी ‘भारत’च्या सेटवरील सुनीलचा एक फोटो शेअर झाला होता. या फोटोमध्ये सुनीलने फिल्मी अंदाजात पोज दिली होती. विशेष म्हणजे हा फोटो अभिनेता सलमान खानने काढल्यामुळे त्याची जास्त चर्चा रंगली होती. आता सुनीलने पुन्हा एक नवं फोटोशूट केलं असून यावेळी त्याने फोटग्राफर म्हणून चक्क अभिनेत्री कतरिना कैफची निवड केली आहे.

Hope she was not clicking her selfies. @katrinakaif @bharat_thefilm

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover) on

दरम्यान, सुनीलच्या या फोटोचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये सुनील पुन्हा एकदा स्वॅग करताना दिसत आहे. तर कतरिना त्याचे फोटो काढत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही कलाकार आनंदी दिसत असून कतरिनाही एखाद्या फोटोग्राफरप्रमाणे सुनीलचे फोटो काढण्यात व्यग्र असल्याचं दिसून येतं आहे. या फोटोला सुनीलने हटके कॅप्शन दिलं आहे.

‘आशा आहे कतरिनाने सेल्फी न काढता माझेच फोटो काढले असतील’, असं कॅप्शन सुनीलने दिलं आहे. पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या सुनीलच्या पदरात भारतव्यतिरिक्त विशाल भारद्वाज ‘पटाखा’ हा चित्रपटही पडल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 11:51 am

Web Title: sunil grover bharat shooting video viral with katrina
Next Stories
1 प्रिया म्हणते, प्रत्येकानं केरळवासीयांना केलेल्या मदतीचा आकडा जाहीर करावा कारण…
2 RK Studios : आर.के. स्टुडिओविषयीच्या ‘या’ रंजक गोष्टी माहित आहेत का?
3 Video :चर्चा तर होणारच, बॉलिवूडमधलं कथित जोडपं मलायका अर्जुन एकत्र
Just Now!
X