कॉमेडियम सुनील ग्रोवर अतिशय लोकप्रिय आहे. त्याने अभिनय आणि विनोदाने अनेकांची मने जिंकली आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून सुनील छोट्या पडद्यापासून लांब होता. आता सुनील एक नवा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते आनंदी झाल्याचे दिसत आहे. नुकताच या शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

स्टार भारत या वाहिनीवर ‘गँग्स ऑफ फिल्मिस्तान’ हा नवा शो सुरु होणार आहे. या शोमध्ये सुनील ग्रोवरसोबत शिल्पा शिंदे, सुगंधा मिश्रा, सिद्धार्थ सागर, उपासना सिंह आणि जतिन सूरी हे कलाकार दिसणार आहेत. नुकताच शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. शोमध्ये सुनील ग्रोवर एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

गँग्स ऑफ फिल्मिस्तान हा शो ३१ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. स्टार भारत वाहिनीवर रात्री आठ वाजता हा शो प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रोमोमधील सुनील ग्रोवरचा अनोखा अंदाज पाहता चाहत्यांमध्ये शो बाबतची उत्सुकता वाढली आहे.