07 March 2021

News Flash

२४ वर्षांनंतर एकत्र येणार सनी देओल- डिंपल कपाडिया

दोघंही तब्बल ११ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते

डिंपल कपाडिया आणि सनी देओल

८० च्या दशकात सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आले होते. पण दोघांनीही या गोष्टीला कधी दुजोरा दिला नाही. पण आता हे दोघं लवकरच एका सिनेमात एकत्र येणार असल्याचे ऐकण्यात येत आहे. गेल्या २४ वर्षांमध्ये दोघांनी एकही सिनेमा एकत्र केलेला नाही.
डिंपलचा भाचा करण कपाडिया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. या सिनेमात डिंपल आणि अक्षय कुमार पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहेत. ‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सिनेमात सनी देओलही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून, टोनी डिसुझा या सिनेमाचे दिग्दर्शन करेल.

काही दिवसांपूर्वी केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये सनी आणि डिंपल परदेशात सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटताना दिसले होते. दोघांना एका बस स्टॉपवर हातात हात घालून बसलेले पाहण्यात आले होते.

सनी आणि डिंपल यांचे फार जुने नाते आहे. राजेश खन्ना यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर डिंपल यांनी राजेश यांचे घर सोडले. या दरम्यान डिंपलने सनीसोबत अनेक सिनेमांत काम केले. याच दरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि त्यांच्या नात्याची चर्चा होऊ लागली. काही दिवसांनी हे दोघं एकत्र राहत असल्याच्या चर्चाही येऊ लागल्या होत्या. डिंपल आणि सनीने पाच सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे.

दोघंही तब्बल ११ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. सनीने डिंपलला पत्नीचा दर्जाही दिला होता. एकीकडे सनीचे पूजाशी आधीच लग्न झाले होते, पण तरीही त्याने डिंपलशी नाते जोडले. तर दुसरीकडे डिंपलने राजेश खन्ना यांच्याशी नाते तोडले होते. ‘पिंकविला’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सनी आणि डिंपल एकमेकांना डेट करत होते तेव्हा डिंपलच्या दोन्ही मुली ट्विंकल आणि रिंकी खन्ना सनीला ‘छोटे पापा’ या नावाने हाक मारायच्या. सध्या सनी ‘पल पल दिल के पास’ सिनेमाच्या दिग्दर्शनात व्यग्र आहे. या सिनेमातून त्याचा मुलगा करण देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 12:03 pm

Web Title: sunny deol and dimple kapadia film karan kapadia
Next Stories
1 ..तेव्हा जेनेलिया रितेशशी बोलत नव्हती
2 Rajinikanth’s political debut: रजनीकांतच्या अॅपवर ३ लाख लोकांनी केली नोंदणी
3 PHOTOS : ..अन् मनिषावर खिळल्या सर्वांच्या नजरा
Just Now!
X