News Flash

PHOTOS : सनी देओलच्या पत्नीचे फोटो पाहिलात का?

आजवर कधीच सनीच्या पत्नीची झलक कोणत्याही पार्टीत किंवा कार्यक्रमात पाहायला मिळालेली नाही.

सनीच्या पत्नीचे नाव पूजा देओल आहे.

बॉलिवूडमध्ये ८०-९०चा काळ गाजवणारा अभिनेता म्हणजेच सनी देओल. ‘ये ढाई किलो का हाथ जब किसी पे पड़ता है न, तो आदमी उठता नहीं उठ जाता है’ या एका संवादामुळे अनेक लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सनीने काल ६१ वा वाढदिवस साजरा केला. त्याचा जन्म १९ ऑक्टोबर १९५६ रोजी झाला होता. मूळ नाव अजय सिंग देओल असणाऱ्या सनीचा मुलगा करण लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. देओल कुटुंबामधील धर्मेंद्र, बॉबी, करण, ईषा, आहाना हे सर्वांच्याच परिचयाचे आहेत. मात्र, आजवर कधीच सनीच्या पत्नीची झलक कोणत्याही पार्टीत किंवा कार्यक्रमात पाहायला मिळालेली नाही.

वाचा : सागर कारंडेने तिच्यासाठी लिहिलं खास पत्र!

सनीच्या पत्नीचे नाव पूजा देओल आहे. ती एक गृहिणी असून, बॉलिवूडच्या कोणत्याही पार्टीमध्ये जात नाही. तसेच ती प्रसारमाध्यमांपासूनही दूर असते. त्यामुळे तिचे फारसे फोटो पाहावयास मिळत नाहीत. करण शिवाय सनी – पूजाला आणखी एक मुलगा आहे. त्याचे नाव राजवीर असून, तोही प्रसारमाध्यमांपासून दूरच असतो. दरम्यान, सनीच्या पत्नीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वाचा : तेजस्विनी, संजय, उमेश, सिद्धार्थच्या ‘ये रे ये रे पैसा’चे हटके पोस्टर फोटोशूट!

‘बेताब’ या चित्रपटाने सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत. पण या अपयशी ठरलेल्या चित्रपटांमधील त्याचे संवाद मात्र आजही त्याच्या चाहत्यांच्या ओठांवर आहेत. सनीचा जन्म १० ऑक्टोबर १९५६ मध्ये झाला. त्याच्याकडे पाहून त्याच्या वयाचा अंदाज बांधणे अवघड आहे. हा ६० वर्षीय अभिनेता अजूनही तरूणच वाटतो आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिकाही पार पाडतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 1:46 pm

Web Title: sunny deol wife pooja rare photos
Next Stories
1 ‘पद्मावती’च्या रांगोळीची नासधूस करणाऱ्या १३ जणांना अटक
2 सागर कारंडेने तिच्यासाठी लिहिलं खास पत्र!
3 बच्चन कुटुंबियांनी अशी साजरी केली दिवाळी
Just Now!
X