14 July 2020

News Flash

Video : सनी लिओनीच्या पाठीला गंभीर दुखापत?

सनीची पाठ रक्ताळलेली दिसत आहे

आपल्या हॉट अंदाजामुळे अभिनेत्री सनी लिओनी कायमच चर्चेत असते. त्यामुळेच तिच्याविषयीची कोणतीही चर्चा चाहत्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरते. यामध्येच सध्या सोशल मीडियावर तिच्या पाठीला झालेल्या गंभीर दुखापतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सनीची पाठ रक्ताळलेली दिसत आहे. त्यामुळे सनीला नेमकी कसली दुखापत झाली आहे हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सनीच्या पाठीला खरोखरची दुखापत झाली नसून एका फोटोशूटमधील हा व्हिडीओ आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मेकअप आर्टिस्ट सनीच्या पाठीवर मेकअप करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा मेकअप अत्यंत सुंदररित्या करण्यात आला असून खरोखरचं सनीला दुखापत झाल्याचा भास होत आहे. या व्हिडिओमध्ये मेकअप आर्टिस्टने सनीच्या पाठीवर आर्टिफिशियल स्किन लावली आहे.

वाचा : इव्हान्काच्या सौंदर्याला ‘या’ बॉलिवूडच्या मेकअप आर्टिस्टचा टच!

दरम्यान, हा व्हिडीओ सनीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमधून तिने जनावरांना त्रास न देण्याचा संदेश दिला आहे. पॉर्नस्टार ते बॉलिवूड स्टार असा प्रवास करणारी सनी आज लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक चर्चा वेगाने पसरत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 10:19 am

Web Title: sunny leone new makeup video goes viral ssj 93
Next Stories
1 इव्हान्काच्या सौंदर्याला ‘या’ बॉलिवूडच्या मेकअप आर्टिस्टचा टच!
2 हॅरी पॉटर पडला ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात; दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
3 Video : प्रवीण तरडे मराठीत सर्वाधिक मानधन घेतात का? पाहा ते काय म्हणतात..
Just Now!
X