11 December 2017

News Flash

ते प्रायव्हेट जेट माझं नव्हतच- दिलजित दोसांज

'न्यू बिगिनिंग स्टार्ट्स विथ प्रायव्हेट जेट' असं मी म्हटलं होतं. पण...

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 6:25 PM

दिलजित दोसांज

पंजाबी गायक दिलजित दोसांजने काही महिन्यांपूर्वी प्रायव्हेट जेट घेतल्याच्या बातम्यांना उधाण आलं होतं. इतकच नव्हे, तर त्याच्या या प्रायव्हेट जेटमधील काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आले होते. पण, ते जेट दिलजितचं नव्हतंच. खुद्द दिलजित दोसांजनेच एका कार्यक्रमात याबाबतची माहिती दिली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात दिलजितने नुकतीच हजेरी लावली होतीत. यावेळी अभिनेत्री सोनम बाजवाही त्याच्यासोबतच होती. दिलजितच्या येण्याने ‘द कपिल शर्मा शो’च्या मंचावर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला होता. यामध्येच गप्पांच्या ओघात कपिल शर्माने दिलजित दोसांजला त्याच्या प्रायव्हेट जेटविषयी काही प्रश्न विचारले.

कपिलच्या याच प्रश्नांना उत्तर देत दिलजितने ते प्रायव्हेट जेट आपलं नसल्याचं स्पष्ट केलं. ”एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला प्रायव्हेट जेटची सोय करुन देण्यात आली होती. त्यावर मी फोटो पोस्ट करत ‘न्यू बिगिनिंग स्टार्ट्स विथ प्रायव्हेट जेट’ असं कॅप्शन त्याला दिलं होतं. पण, त्या कॅप्शनचा वेगळाच अर्थ घेत ते जेट माझंच आहे अशा बातम्या दुसऱ्या दिवशी झळकल्या. पण, खरं सांगायचं तर ते जेट माझं नव्हतं हेच खरं’, असं दिलजितने या कार्यक्रमात स्पष्ट केलं.

कपिलच्या शो मध्ये दिलजित दोसांज ‘सुपर सिंग’ या पंजाबी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आला होता. पंजाबी चित्रपटांचा वाढता प्रेक्षकवर्ग आणि दिलजितच्या नावाभोवती असणारं चाहत्यांचं वलय पाहता त्याचा चित्रपटाला चांगलाच फायदा होत आहे. पंजाबी चित्रपटसृष्टीत नावाजलेल्या दिलजितने बॉलिवूडमध्येही स्वत:चं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या दिलजितच्या चाहत्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात विशेषत: तरुणींचा जास्त समावेश आहे असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : महिला चाहत्यांमुळेच मला जास्त त्रास झाला- दिलजित दोसांज

First Published on June 19, 2017 6:17 pm

Web Title: super singh fame punjabi singer turned actor diljit dosanjh clarifies that he is not the owner of that private jet