अभिनेता सुशांत सिंह राजपूतने या जगाचा निरोप घेऊन आता जवळपास एक आठवडा उलटला आहे. मात्र अद्यापही या धक्क्यातून त्याचे चाहते आणि कुटुंबीयांना सावरले नाहीत. वयाच्या ३४ व्या वर्षी आयुष्याचा अंत करणाऱ्या या कलाकाराच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे सध्या सुशांत सिंह राजपूत याच्याविषयी सोशल मीडियावर रोज नवनवीन चर्चा पाहायला मिळते. अलिकडेच त्याचा श्वान फज याचादेखील सुशांतच्या आत्महत्येनंतर मृत्यु झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र ही अफवा असल्याचं समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुशांतचा श्वान फज याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. सुशांतच्या निधनामुळे फज अत्यंत उदास झाला असून तो प्रत्येक ठिकाणी सुशांतला शोधत असल्याचं यात पाहायला मिळालं. त्यानंतर फजचा अचानकपणे मृत्यु झाल्याची बातमीही सोशल मीडियावर चर्चिली जाऊ लागली. मात्र ही अफवा असून फज आणि सुशांतचे अन्य चारही कुत्रे व्यवस्थित असल्याचं त्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे.

Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर मध्यंतरी एका सोफ्यावर मृतावस्थेत असलेल्या एका श्वानाचा फोटो व्हायरल झाला होता. हा श्वान म्हणजे सुशांतचा लाडका कुत्रा फज असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र हा श्वान फज नसून सध्या तो सुखरुप आणि व्यवस्थित आहे. तसंच सध्या फज सुशांतच्या पावना हाऊस येथे आहे.

दरम्यान, फज हा लॅब्राडोर जातीचा श्वान असून सुशांतचं त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं. सुशांतने सोशल मीडियावर फजसोबत काही फोटो, व्हिडीओही शेअर केले होते. त्यामुळे सुशांतच्या निधनानंतर फज एकाकी पडला असून तो उदास असल्याचं मनवीर गुर्जरने म्हटलं होतं. बिग बॉस १० चा विजेता मनवीर गुर्जर याने काही दिवसापूर्वी सुशांत आणि फजच्या फोटोंचा एक कोलाज शेअर केला होता. यात फजचे सुशांतसोबतचे काही फोटो आणि सुशांतच्या आठवणीत उदास झालेला एक फोटो असे काही फोटो कोलाज केले होते.