Virat Kohli 2nd player to reach 500 runs for 7th time in IPL : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४५ व्या सामन्यात आरसीबीने गुजराच टायटन्सचा ९ विकेट्सनी पराभव आपला तिसरा विजय नोंदवला. आरसीबीच्या विजयात विल जॅक्सने शतकी खेळी साकारत मोलाचे योगदान दिले. त्याचबरोबर विराट कोहलीनेही शानदार खेळी केली आहे. या सामन्यात कोहलीने केवळ ४४ चेंडूत ७० धावांची खेळी साकारली. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोहली आधीच आघाडीवर होता, आता पुन्हा एकदा त्याने आपली दावेदारी भक्कम केली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने या खेळीच्या जोरावर इतिहास रचला आहे.

आरसीबीने विराट-जॅकच्या जोरावर गुजरातविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने फलंदाजी तर केलीच पण विल जॅकने किंग कोहलीपेक्षाही तुफानी खेळी खेळली. या सामन्यात जॅकने अवघ्या ४१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. या दरम्यान त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि १० षटकार पाहायला मिळाले. तसेच दुसरीकडे कोहलीने या सामन्यात शानदार खेळी करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Virat Kohli Creates History, Virat Kohli Completes 3000 runs in ICC World Cup
ICC World Cup टूर्नामेंटचा ‘किंग’ ठरला विराट कोहली! विश्वचषकाच्या इतिहासात ही कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
Smriti Mandhana first Indian woman to hit consecutive ODI hundreds
INDW vs SAW: स्मृती मानधनाने शतकी खेळीसह रचला इतिहास, वनडेमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज
Smriti Mandhana Becomes Second Indian Woman Player to Complete 7000 Runs in International Cricket
IND W vs SA W: स्मृती मानधना ठरली टीम इंडियासाठी तारणहार; शतकी खेळीसह ऐतिहासिक कामगिरी करणारी दुसरी भारतीय फलंदाज
Arshdeep Singh to pick a wicket on the first ball of a T20 WC 2024 Match against USA
IND vs USA : अर्शदीप सिंगने रचला इतिहास! आतापर्यंत कोणत्याच भारतीय गोलंदाजाला न जमलेला केला पराक्रम
India Won Against Pakistan by 6 Runs in New York Marathi News
IND vs PAK Highlights : हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज
Rohit Sharma First Batter to Hit Six on Shaheen Shah Afridis first over in T20
IND vs PAK: शाहीन आफ्रिदीविरूद्धच्या एकाच षटकारासह हिटमॅनने रचला इतिहास, टी-२० मध्ये ही कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
Rohit is the first player to play most T20 World Cup
T20 WC 2024 : रोहित शर्माचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! आजपर्यंत जगातील कोणत्याच खेळाडूला न जमलेला केला पराक्रम
Rohit Sharma breaks Dhoni's record
IND vs IRE : रोहित शर्माने धोनीला मागे टाकत रचला इतिहास! ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच कर्णधार

विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक ५०० हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये आपले नाव समाविष्ट केले आहे. कोहलीने आयपीएलमध्ये सातव्यांदा ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. यासह कोहलीने ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. वॉर्नरने ७ वेळा आयपीएलमध्ये ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. आता अशी कामगिरी करणारा कोहली हा वॉर्नरनंतरचा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – GT vs RCB : गुजरातविरुद्धच्या विजयानंतरही आरसीबीने नोंदवला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत पंजाब किंग्जची केली बरोबरी

आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा कायम –

गुजरातला हरवून बंगळुरूनेही प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. बंगळुरूने या मोसमातील तिसरा विजय गुजरातविरुद्ध नोंदवला आहे. याआधीच्या सामन्यातही बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दणदणीत विजय मिळवला होता. आता जर बंगळुरूने पुढील सर्व सामने जिंकले, तर ते प्लेऑफसाठी आपला दावा करू शकेल. आतापर्यंत आरसीबी या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही, त्यामुळेच बंगळुरूचे खेळाडू सर्व सामने जिंकण्यासाठी दमदार प्रदर्शन करताना दिसत आहेत.