News Flash

“खरंच माफी मागायची गरज नव्हती”; सलमानच्या ‘त्या’ ट्विटवर सोना मोहापात्रा संतापली

सलमानने सुशांतसाठी केले होते ट्विट, पण...

“खरंच माफी मागायची गरज नव्हती”; सलमानच्या ‘त्या’ ट्विटवर सोना मोहापात्रा संतापली

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येसाठी अभिनेता सलमान खानला जबाबदार धरले जात आहे. परिणामी सलमानवर सोशल मीडिद्वारे जोरदार टीका होत आहे. सातत्याने होणाऱ्या या टीकेवर सलमानने ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली. सुशांतच्या चाहत्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन त्याने आपल्या चाहत्यांना केले. या ट्विटवर गायिका सोना मोहापात्रा हिने मात्र संताप व्यक्त केला आहे. हा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचं ती म्हणाली आहे.

अवश्य पाहा – सुशांतचा डान्स पाहून ऋषी कपूर झाले होते उत्साही; थ्रोबॅक व्हिडीओ होतोय व्हायरल…

अवश्य पाहा – लॉकडाउनमुळे अभिनेत्री अडकली लंडनमध्ये; एक झलक पाहण्यासाठी फॅन्स घराखाली करतात गर्दी

“पोस्टर बॉयने पीआरच्या मदतीने एक मोठा मूव्ह खेळला आहे. डिजिटल आर्मीच्या मदतीने दिलेल्या धमक्यांना उत्तर देण्याची खरंच गरज नव्हती. जेव्हा जेव्हा तो अशा प्रकरणांमध्ये अडकतो, तेव्हा आपल्या वडिलांना पुढे करतो.” अशा आशयाचे ट्विट मोहाने केलं आहे. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यापूर्वी काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी आणि ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) ही कामगारांची संघटना सलमानच्या मदतीसाठी पुढे सरसावली होती. सलमानच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असं त्यांनी एका पत्रकाद्वारे म्हटलं होतं. परंतु यानंतरही सलमान विरुद्धचा रोष अद्याप कमी झालेला नाही. त्याच्या विरोधात सुरु असलेल्या ऑनलाईन पिटिशनवर आता पर्यंत ३४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी सह्या केल्या आहेत. तसेच गेल्या काही तासांत त्याचे ५५ हजार सोशल मीडिया फॉलोअर्स कमी झाले आहेत. यावरुनच सलमान विरुद्ध पेटलेला संताप आणखी वाढत असल्याचं दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2020 12:40 pm

Web Title: sushant singh rajput sona mohapatra tweet on salman khan mppg 94
Next Stories
1 सुशांतचा डान्स पाहून ऋषी कपूर झाले होते उत्साही; थ्रोबॅक व्हिडीओ होतोय व्हायरल…
2 ‘सावनी अनप्लग्ड’ची चाहत्यांवर मोहिनी; तिसरं पर्व श्रोत्यांच्या भेटीला
3 ‘ते रहस्य तुझ्यासोबतच गेलं’; सुशांतसाठी भूमिकाची भावनिक पोस्ट