मराठी चित्रपसृष्टीतला चॉकलेट बॉय आणि सगळ्यांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. श्रेयस जाधव दिग्दर्शित मी पण सचिन या आगामी चित्रपटामध्ये स्वप्नीलने एका क्रिकेटपटूची भूमिका वठविली असून त्याच्या या नव्या भूमिकेमुळे त्याच्या चॉकलेट बॉय या इमेजला तो छेद देणार आहे. विशेष म्हणजे या नव्या भूमिकेसाठी स्वप्नील प्रचंड मेहनत करत असून सध्या तो जीममध्ये घाम गाळत आहे. त्याचा वर्कआऊट करतानाचा असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

‘मी पण सचिन’मध्ये स्वप्नीलने तरुण आणि मध्यमवयीन अशा दोन प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्याला या भूमिकांसाठी तब्बल १५ किलो वजन कमी करावे लागले. यासाठी त्याने कडक डाएट आणि न चुकता भरपूर व्यायामही केला. स्वप्नीलने या चित्रपटातील भूमिकेसाठी मुख्यत्वे शारीरिक तंदरुस्तीकडे जास्त लक्ष दिले. कारण खेळाडूची भूमिका निभावत असताना त्याला खेळाडूसारखेच दिसणे, वागणे, चालणे गरजेचे होते. यासाठी स्वप्नीलने एखाद्या खेळाडूची बॉडी लँग्वेज कशी असावी याचा अभ्यास केला आणि त्यासाठी कसरत सुरु केली. वजन कमी करण्यासाठी त्याला दिग्दर्शक श्रेयस जाधवनेही मदत केली.

radhika deshpande shares post related to mangalsutra
“मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केव्हा, कधी…”, मराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “आम्ही स्त्रिया…”
While playing the role of Arundhati, Madhurani Prabhulkar find out a new these in herself
अरुंधतीची भूमिका करताना मधुराणी प्रभुलकरला स्वतःमधल्या ‘या’ नव्या गोष्टीचा लागला शोध, म्हणाली…
ankush chaudhari says he never used bad words
“त्या दिवसापासून पुन्हा शिवी दिली नाही”, ‘लालबाग परळ’, ‘दुनियादारी’ चित्रपटांबद्दल अंकुश चौधरी म्हणाला, “माझ्या आईने…”
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

श्रेयसने स्वप्नीलला तीन महिने पुण्यात ठेऊन घेतले आणि रोज श्रेयश त्याच्याकडून व्यायाम आणि क्रिकेट प्रॅक्टिस करून घ्यायचा. स्वप्नील सकाळी फिज़िकल फिटनेस आणि दुपारी क्रिकेट प्रॅक्टिस करायचा. यासोबतच क्रिकेटरची भूमिका करण्यासाठी त्याला क्रिकेट हा खेळ शिकणे आवश्यक होते. म्हणूनच क्रिकेट प्रशिक्षकांकडून तब्बल तीन महिने त्याने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. स्वप्नील सकाळी तीन तास कसरत आणि दुपारी तीन तास क्रिकेट प्रॅक्टिस करायचा. शिवाय या खेळातील बारकावे, नियम हे सर्व त्याने आत्मसाद केले. जेणेकरून चित्रपटात तो कुठेही खोटा दिसू नये किंवा त्याचा खेळ खोटा वाटू नये. अगदी उन्हात, पावसात सुद्धा त्याने प्रॅक्टिस केली. आणि त्याच्या मेहनतीची पोचपावती म्हणजे तो कॅमेरासमोर अगदी खरा क्रिकेटर असल्यासारखा सहज वावरला.

‘हे सर्व करणे एवढी मेहनत घेणे आमचे कामच आहे. कारण जर प्रेक्षकांना हे सर्व पडद्यावर पाहताना कुठेही खोटेपणा जाणवता कामा नये. प्रेक्षक एवढा विश्वास ठेऊन चित्रपट पाहायला जातात त्यांचा हिरमोड व्हायला नको. प्रेक्षकांसाठी आम्ही जी मेहनत घेतो हे आमचे कर्तव्यच आहे. कारण आज आम्ही सर्व कलाकार जे काही थोडे फार आहोत ते फक्त याच प्रेक्षकांमुळे. आणि या सर्व मेहनतीचे श्रेय मी श्रेयश जाधवला देतो’, असं स्वप्नील म्हणाला.

‘मी पण सचिन’ हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे या चित्रपटाचे निर्माता असून श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्याने श्रेयश जाधव हे दिग्दर्शनात देखील पाऊल टाकत आहे.