आपले मत ठामपणे मांडण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ओळखली जाते. सामाजिक विषयावर ती वेळोवेळी ठाम भूमिका मांडत आली आहे. ‘पद्मावत’ चित्रपटात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी जोहर व सती प्रथेचे अविचाराने उदात्तीकरण केले आहे, अशी टीका तिने एका खुल्या पत्रात केल्याने ती गेल्या काही दिवासांपासून बरीच चर्चेत आहे. त्यानंतर तिने आता स्वतःबद्दलचा एक खळबळजनक खुलासा केल्याचे वृत्त ‘पिंकव्हिला’ वेबसाइने दिले आहे.

वाचा : ‘ठग’ आमिर आणि ‘गल्ली बॉय’ रणवीरची जोडी जमली रे!

स्वराने नुकतेच ‘एण्टरटेन्मेन्ट की रात’ शोसाठी एका एपिसोडचे चित्रीकरण केले. या शोमध्ये तिने काही लक्षवेधी वक्तव्ये केली. आपले वय लपवणारी आणि फॅट्स घटवणारी सर्जरी केल्याचे तिने शोदरम्यान सांगितल्याचे समजते. तिने न डळमळता केलेल्या या खुलाश्याने सेटवरील अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

वाचा : हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर एली म्हणते..

शोमधील एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘स्वरा म्हणाली की, चित्रपटसृष्टीतील इतर काही लोकांप्रमाणे तिलाही स्वतःचे वय लोकांसमोर उघड करण्यास आवडत नाही. एका चाहत्याने ( जो तिच्या कॉलेजमध्ये तिच्यासोबत आधी होता ) एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून विकिपीडियावर स्वराचे वय चुकीचे दाखवण्यात आल्याचे सर्वांच्या लक्षात आणून दिले होते. विकिपीडियावर आता स्वराचे वय २९ दाखवण्यात आले आहे.’ आपले वजन नियंत्रित राहावे यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केल्याचेही स्वराने सांगितले. ती म्हणाली की, समीक्षकांची पसंती मिळालेली अभिनेत्री असूनही माझ्यामध्ये न्यूनगंड होता. त्यामुळे मी फॅट घटवणाऱ्या प्रक्रियेला सामोरे गेले.

वीरे दी वेडिंग या आगामी चित्रपटातून स्वरा ही सोनम कपूर आणि करिना कपूर खान यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसेल.