News Flash

ब्रेकअपनंतर स्वराच्या आयुष्यात फुलतंय नवं प्रेम; या दिग्गज व्यक्तीच्या मुलाला करतेय डेट?

'तनू वेड्स मनू' चित्रपटाच्या पटकथालेखकाशी स्वराचं अफेअर होतं. पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांचं नुकतंच ब्रेकअप झालं.

स्वरा भास्कर

परखड मतं आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. ‘रांझना’, ‘तनू वेड्स मनू’, ‘नील बट्टे सन्नाटा’, ‘वीरे दी वेडिंग’ यां चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना विशेष लक्षात राहिल्या आहेत. स्वरा तिच्या अभिनयासाठी आणि ट्विटसाठी जरी सतत चर्चेत राहत असली तरी तिचं वैयक्तिक आयुष्य फारसं चर्चेत आलं नाही. काही दिवसांपूर्वी तिच्या ब्रेकअपचं वृत्त होतं. गेल्या पाच वर्षांपासून ती पटकथालेखक हिमांशू वर्माला डेट करत होती. मात्र या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर आता स्वराच्या आयुष्यात नवीन प्रेम फुलत असल्याचं समजतंय. एका दिग्गज व्यक्तीच्या मुलाला ती डेट करत असल्याचं वृत्त ‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटने दिलं आहे.

स्वरा भास्कर ही दिवंगत अभिनेते गिरीष कर्नाड यांचा मुलगा रघू कर्नाडला डेट करत असल्याचं वृत्त आहे. रघू पत्रकार आणि लेखक असून या दोघांना एकत्र सिनेमाला जाताना पाहिलं गेलं आहे. त्यानंतर दोघंही डिनर डेटला एकत्र गेले. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्वरा आणि हिमांशू ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटासाठी एकत्र काम करत असताना डेट करू लागले होते. यात स्वरा सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. तर हिमांशूने या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. यानंतर ‘रांझना’ आणि ‘नीलबट्टे सन्नाटा’ या चित्रपटासाठी दोघांनी एकत्र काम केलं. मात्र काही कारणास्तव हे नातं टिकू शकलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 6:15 pm

Web Title: swara bhasker is again in love with this great actors son ssv 92
Next Stories
1 असं घडलं किशोरी शहाणेंचं करिअर!
2 ‘खान’दानला मागे टाकत जगभरात सर्वाधिक कमाई करणारा ‘हा’ एकमेव भारतीय अभिनेता
3 ‘तारक मेहता..’मध्ये ही अभिनेत्री साकारणार आत्माराम भिडेच्या मुलीची भूमिका
Just Now!
X