अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा ऐतिहासिकपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळाला. एकीकडे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीची गर्दी करत आहेत. तर दुसरीकडे काही प्रेक्षकांनी काही खास मुलांसाठी स्वत:च्या सीट्स दिल्या. या प्रेक्षकांनी असं का केलं हे  जाणून घेतल्यानंतर अभिनेत्री काजोलने सोशल मीडियावर या प्रेक्षकांचं कौतुक केलं आहे.

हिंदमाता चित्रपटगृहामध्ये कर्करोगग्रस्त मुलांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. मात्र आयोजक आणि चित्रपटगृहाचे व्यवस्थापक यांच्यातील समन्वयाअभावी या मुलांच्या स्क्रिनिंगची वेळ चुकली. विशेष म्हणजे ही गोष्ट चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी याविषयी प्रेक्षकांना सांगितलं. त्यानंतर प्रेक्षकांनीही सामंजस्य दाखवत उदार मनाने स्वत:ची जागा या मुलांना आणि त्यांच्या पालकांना देऊ केली. ही माहिती काजोलला समजल्यानंतर तिने ट्विटवर एक पोस्ट शेअर करत “हीच खरी माणुसकी आहे, आपणदेखील हा आदर्श घेऊन असंच काम केलं पाहिजे आणि हे कार्य पुढे नेलं पाहिजे”, असं काजोल म्हणाली.

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Shahid Kapoor Kriti Sanon film teri baaton mein aisa uljha jiya on OTT
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल शाहिद-क्रितीचा सिनेमा? वाचा

दरम्यान, ‘तान्हाजी’ या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड सुरु आहे. या चित्रपटाने केवळ पाच दिवसामध्ये ९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये अजने तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली असून काजोलने त्यांच्या पत्नीची भूमिका वठविली आहे.