News Flash

‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूशी तमन्ना भाटिया करणार लग्न?

दुकानात खरेदी करत असतानाचा या दोघांचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

तमन्ना भाटिया

बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर जितके सक्रिय असतात, तितक्याच त्यांच्यासंबंधीच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्यासंबंधीही सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणारी एक बातमी पुढे आलीये. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक याच्यासह तमन्ना लग्नाची शॉपिंग करताना दिसली. त्यामुळे हे दोघही लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.

वाचा : शाहरुखने असे केले गणरायाचे विसर्जन

तमन्नाने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून तिचे अनेक कलाकारांसोबत नाव जोडले गेले. मात्र, तिचे खरे प्रेमप्रकरण हे नेहमीच गुपित राहिले. पण, काही दिवसांपूर्वी तिने लग्न करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. ‘न्यूज वर्ल्ड इंडिया’ आणि अन्य काही वेबसाइट्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षभरापासून तमन्ना अब्दुल रझाकशी डेटिंग करतेय. हे दोघेही दुबईतील एका दागिन्यांच्या दुकानात खरेदी करतानाही दिसले होते. दुकानात खरेदी करतानाचा या दोघांचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे लवकरच तमन्ना आणि अब्दुल विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जातेय.

वाचा : ‘लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यात गैर काय?’

दरम्यान, हा फोटो २०१३ सालातील असल्याचेही म्हटले जातेय. त्यावेळी हे दोघे ज्वेलरी शॉपच्या उदघाटनासाठी तेथे गेले होते. पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझाकचे आधीच लग्न झालेले असल्यामुळे क्रिकेट जगतातही याविषयी चर्चा केली जातेय. अचानक हा फोटो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे तमन्ना आणि अब्दुलच्या लग्नाचे वृत्त फिरते आहे. आता हे वृत्त खरं की खोटं ते या दोघांचे अधिकृत वक्तव्य आल्यावरच कळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 10:08 am

Web Title: tamanna bhatia to get married with pak cricketer abdul razzaq
Next Stories
1 सेलिब्रिटी लेखक : करिअरचा श्रीगणेशा बाप्पानेच!
2 Ganesh Utsav 2017 PHOTO : शाहरुखने असे केले गणरायाचे विसर्जन
3 ‘सुबोधसोबतचा मुंबई टू गोवा प्रवास अविस्मरणीय’
Just Now!
X