News Flash

रजनीकांत यांनाही टाकले मागे? एका चित्रपटासाठी विजयने घेतले सर्वाधिक मानधन

विजयचा काही दिवसांपूर्वी ‘मास्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. २०२१मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला तमिळ चित्रपट ठरला आहे.

विजय लवकरच 'थलपथी ६५' चित्रपटात दिसणार आहे.

आजकाल दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेज जास्त पाहायला मिळते. दाक्षिणात्य अभिनेत्यांचे संपूर्ण देशात चाहते आहेत. या यादीमधील एक अभिनेता म्हणजे विजय. विजय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. नुकताच विजयने एका चित्रपटासाठी घेतलेले मानधन इतर अभिनेत्यांच्या तुलनेच सर्वाधिक असल्याचे म्हटले जात आहे.

अभिनेता विजय लवकरच ‘महर्षि’ चित्रपटातील दिग्दर्शक वामसी पैदिपल्ली यांच्या आगामी चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘थलपथी ६५’ असे आहे. ‘कोईमोई’ने दिलेल्या वृत्तानुसार सुपरस्टार विजयने या चित्रपटासाठी १०० कोटी रुपये मानधन घेतले आहे. पण याबाब कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विजयचे हे मानधन इतर अभिनेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे म्हटले जात आहे.

आणखी वाचा : दाक्षिणात्य अभिनेत्रींचा आलियाने मोडला रेकॉर्ड? ‘RRR’साठी घेतले ‘इतके’ मानधन

विजयने ‘थलपथी ६५’ चित्रपटासाठी जर १०० कोटी रुपये मानधन घेतले असले तर तो सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे आतापर्यंतचे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. त्यांनी ‘दरबार’ चित्रपटासाठी ९० कोटी रुपये मानधन घेतले होते. आता विजयने १०० कोटी घेतले असल्याचे समोर आले आहे.

निर्मात्यांनी विजयला ५० कोटी रुपये मानधन दिले असल्याचे देखील म्हटले जात आहे. विजय त्याच्या वाढदिवशी या चित्रपटाची अधिकृतपणे घोषणा करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विजयचा काही दिवसांपूर्वी ‘मास्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. २०२१मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला तमिळ चित्रपट ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 1:56 pm

Web Title: tamil actor vijay leaves rajinikanth behind charges rs 100 crore for a film avb 95
Next Stories
1 तारीख पे तारीख! ‘KGF चॅप्टर 2’चं प्रदर्शन पुन्हा रखडलं
2 ’फादर्स डे’च्या निमित्ताने ‘जून’ टीमकडून सर्व ‘बाबां’ना अनोखी भेट, बाबांसाठी खास गाणं
3 ‘माझा नवरा पर्फेक्ट आहे पण…’, शिल्पाने केला खुलासा
Just Now!
X