पॉप स्टार टेलर स्विफ्ट यांच्या अल्बमला यंदा ५८ व्या ग्रॅमी पुरस्कार समारंभात वर्षांतील उत्कृष्ट अल्बमचा पुरस्कार देण्यात आला, तर रॅप प्रवर्गात केंड्रिक लॅमर यांनी बाजी मारली आहे. वर्षांतील गाणे व वर्षांतील ध्वनिमुद्रिका हे दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार अनुक्रमे ‘एड शीरॅन’ व ‘अपटाउन फंक’ यांना मिळाले आहेत. लॅमार यांना ११ नामांकने होती. त्यांच्या ‘टू पिंप अ बटरफ्लाय’ या रॅप अल्बमला गौरवण्यात आले. रॅप अदाकारी, रॅप गाणे, संगीत व्हिडीओ हे पुरस्कार त्यांना मिळाले.  दोनदा ग्रॅमी पुरस्कार मिळवणारी टेलर स्विफ्ट ही पहिली महिला आहे, तिने फेमस गीतांचा कर्ता केनये वेस्ट याच्यावर टीका केली. आपणच टेलर स्विफ्ट हिला लोकप्रियता मिळवून दिली, अशी दर्पोक्ती त्याने केली होती. त्यावर २६ वर्षांच्या स्विफ्ट हिने सांगितले की, काही लोक आपल्या यशाला कमी लेखू शकतात हे येथील महिलांनी नेहमी लक्षात ठेवावे. जर तुम्ही कामावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही व तुमचे चाहते यांनीच तुम्हाला कीर्तीच्या शिखरावर नेले असते. या वर्षांतील उत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार ब्रिटनचा कलाकार शीरॅन याला मिळाला. त्याला बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्सचा पुरस्कारही मिळाला आहे.  मेघन ट्रेनर हिला आनंदाश्रू आवरले नाहीत; ती म्हणाली की, एल.ए रीज यांनी केवळ गीतलेखिका म्हणून पाहिले नाही तर कलाकार म्हणून माझ्याकडे पाहिले.

अनुष्का शंकर यांना हुलकावणी, तर कपाडिया यांना यश

५८ व्या ग्रॅमी पुरस्कारात सतारवादक अनुष्का शंकर यांना जागतिक संगीत प्रवर्गात पुन्हा यशाने हुलकावणी दिली, तर भारतीय-ब्रिटिश दिग्दर्शक असीफ कपाडिया यांना चित्रपट-माहितीपट प्रवर्गात उत्कृष्ट संगीतासाठी ‘अ‍ॅमी’ या माहितीपटाकरिता संगीताचा पुरस्कार मिळाला. अनुष्का यांचा ‘होम’ हा अल्बम स्पर्धेत होता, त्यांचे वडील सतारवादक रवीशंकर यांना वाहिलेली ती श्रद्धांजली आहे, या प्रवर्गात अँगेलिक किडजो हिला सिंग्ज या संगीतरचनेसाठी जागतिक संगीत पुरस्कार मिळाला. ४४ वर्षांचे भारतीय दिग्दर्शक कपाडिया यांच्या अ‍ॅमी या माहितीपटातील संगीताला ग्रॅमी पुरस्कार मिळाला.