रेश्मा राईकवार

कधी तरी टीव्हीवरच्या त्याच त्याच पठडीतल्या मालिका पाहताना आमच्या लहानपणी ‘रामायण’ मालिका लागायची तेव्हा रस्ते ओस पडायचे, अशा जुन्या मालिकांच्या आठवणीत रमणाऱ्या आईबाबांना या जुन्या मालिका आपल्या मुलांना कधी आणि कशा दाखवता येतील, हा प्रश्न पडायचा. आज अचानक आठवणीतल्या याच मालिकांनी टीव्हीवर घर के लं आहे. या मालिकांचा खजिनाच डिजिटलसारख्या नव्या माध्यमांवरही सहज उपलब्ध झाला आहे. टाळेबंदीची परिस्थिती मनोरंजनविश्वात नव्या-जुन्यांना एकत्र आणणाऱ्या वेगळ्याच समीकरणाची  नांदी ठरेल, अशी कल्पनाही कोणी के ली नव्हती. मात्र सध्या टेलिव्हिजनच्या पोतडीतील जुन्या मालिका आणि ओटीटीवरच्या नव्या वेबमालिका दोन्ही मनोरंजनविश्वासाठी सुफळ संपूर्ण ठरत आहेत.

करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आणि मनोरंजनविश्वाच्या समस्या वाढत गेल्या. मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ात सगळ्या वाहिन्यांवर सुरू असलेल्या मालिकांचे होते तेवढे भाग दाखवून झाले आणि  आता प्रेक्षकांना काय दाखवणार, हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न तात्पुरता का होईना लोकप्रिय झालेले रिअ‍ॅलिटी शोज, ‘डान्स इंडिया डान्स’सारखे नृत्यावर आधारित शोज, ‘सा रे ग म’सारख्या गाण्यावर आधारित रिअ‍ॅलिटी शोजचे जुने पर्व, विनोदी कार्यक्रमांचे जुने भाग दाखवण्याचा सिलसिला सुरू करत सोडवण्यात आला. मात्र यात बाजी मारली ती दूरदर्शनने.. दूरदर्शनकडे जुन्या मालिकांचा उत्तम संग्रह आहे आणि त्याचाच वापर यानिमित्ताने क रायचा निर्णय त्यांनी घेतला. आणि ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘बुनियाद’, ‘द जंगल बुक’, ‘ब्योमके श बक्षी’, ‘चाणक्य’, ‘देख भाई देख’ अशा एके क मालिका या खजिन्यातून बाहेर पडल्या. या जुन्या मालिकांनी टीआरपीची सगळी गणितंच बदलून टाकली. टाळेबंदीमुळे  सगळे कु टुंबच घरात टीव्हीसमोर आले असल्याने जुन्या मालिका या घराघरातील दोन पिढय़ांना जोडणारा दुवा ठरला. एका पिढीसाठी हा स्मरणरंजनाचा खेळ होता तर दुसऱ्या पिढीसाठी आतापर्यंत ऐकिवात असलेल्या या मालिका प्रत्यक्ष पाहण्याचा योग जुळून आला. त्यांच्यासाठी या मालिकांचा आशय पूर्णपणे नवा असल्याने त्यांचीही तक्रार असण्याचे कारण नव्हते. त्यामुळे टेलिव्हिजन इतिहासात नवे विक्रम नोंदवले गेले. विस्मृतीत गेलेली रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका ठरली. जुन्या मालिका प्रेक्षकांना आवडत आहेत हे लक्षात आल्यावर झी टीव्हीनेही ‘हम पाँच’, ‘झी हॉरर शो’ सारख्या जुन्या मालिकांचे पुन:प्रसारण सुरू के ले. तर एकता कपूरच्या काही गाजलेल्या जुन्या मालिकाही पुन्हा दाखवल्या जाऊ लागल्या. या सगळ्या गडबडीत आत्ताच्या मालिका आणि कलाकार यांच्याशीही प्रेक्षकांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न जसा वाहिन्यांक डून के ला जातो आहे तसा तो मालिका आणि चित्रपटातील कलाकारांकडूनही जाणीवपूर्वक के ला जातो आहे. त्यामुळे एका वेगळ्या अर्थाने कलाकार आणि  प्रेक्षकांमधील ही दरी मिटली असून ते एकमेकांशी जोडले गेले आहेत.

अर्थात, कलाकार आणि प्रेक्षकांना एकत्र बांधून ठेवण्यात ओटीटी आणि समाजमाध्यमे यांचा वाटा मोलाचा ठरला आहे. चित्रपटगृहे बंद झाली, चित्रीकरण ठप्प झाले आणि सर्वसामान्यांसारखीच आपापल्या घरात अडकू न पडलेली कलाकार मंडळीही अस्वस्थ झाली. त्यामुळे लोकांशी संवाद साधण्याचा, त्यांच्या संपर्कात राहण्याचा मार्ग कलाकारांनीच शोधून काढला. फे सबुक लाइव्ह, इन्स्टा लाइव्ह, इन्स्टा स्टोरी, झूम या अ‍ॅपच्या माध्यमातून कु ठलाही मेकअप नसलेले हे कलाकारांचे चेहरे लोकांना भेटू लागले आहेत. विद्या बालनचा मोदक बनवण्याच्या तयारीपासून ते कतरिनाच्या भांडी घासण्यापर्यंतचे सगळे व्हिडीओ प्रेक्षकांपर्यंत रोजच्या रोज पोहोचत आहेत. प्रेक्षकांसाठीही आपल्या आवडत्या कलाकारांचे हे  खरे रूप, त्यांच्या दैनंदिन गोष्टी पाहण्याचा अनुभव नवा असल्याने मनोरंजनाचे हे  आणखी एक दालन टाळेबंदीच्या या काळात उघडले  गेले आहे असे  म्हणणे वावगे  ठरणार नाही.

टाळेबंदीत रखडलेल्या चित्रपटांना आणि एका अर्थाने  टेलिव्हिजन विश्वासाठीही ओटीटी माध्यमे नवा आधारस्तंभ ठरली आहेत. टाळेबंदीपूर्वी आठवडा- दोन आठवडे आधी प्रदर्शित झालेले अनेक हिंदी, मराठी आणि अन्य प्रादेशिक भाषेतील चित्रपट ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित झालेले आहेत. सद्य:स्थितीला प्रत्येक टेलिव्हिजन वाहिनीचे आपापले स्वतंत्र ओटीटी अ‍ॅप असल्याने त्यांची निर्मिती असलेल्या मालिका-चित्रपट ओटीटीच्या माध्यमातून एरव्हीही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. आता तर अंग्रेजी मीडियम, शुभमंगल ज्यादा सावधान, बागी ३, तापसी पन्नूचा बहुचर्चित थप्पड असे एकापाठोपाठ एक चांगले हिंदी चित्रपट कु ठल्या ना कु ठल्या ओटीटी प्लॅटफॉम्र्सवर प्रदर्शित होत असतात. शिवाय, नेटफ्लिक्सची मनी हैस्ट, एक्स्ट्रॅक्शन, अ‍ॅमेझॉनची फोर मोअर शॉट्स, हॉटस्टारवर स्पेशल ऑप्स अशा नवनव्या वेबमालिकांचा रतीब सातत्याने सुरू असल्याने प्रेक्षकांना नव्या आशयाची कमी कु ठेही जाणवत नाही आहे. या नव्या वेबमालिका आणि चित्रपटांमुळे ओटीटीची प्रेक्षकसंख्या सातत्याने वाढते आहे. याच वेबमालिकांना आता टेलिव्हिजनशी जोडून घेण्याचाही प्रयत्न सुरू असल्याने टाळेबंदीचा काळ हा मनोरंजन वाहिन्या, ओटीटी प्लॅटफॉम्र्स आणि चित्रपट उद्योगासाठीही नवनव्या व्यवसायवाढीच्या संधींची पर्वणी ठरतो आहे. नव्या-जुन्या मनोरंजनाला एकत्र आणणारे हे समीकरण काही प्रमाणात भविष्यातील या व्यवसायाची दिशा बदलणारे ठरेल यात शंका नाही.