विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्याच्या घडीला अनेकांच्यात मनाचा ठाव घेत आहेत. या सेलिब्रिटी कपलच्या नात्याच्या सुरुवातीपासूनच त्यांनी चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. अनेकांनी तर रिलेशनशिपच्या बाबतीत या दोघांनाच फॉलो केल्याचंही पाहिलं गेलं. पण, प्रत्येक बाबतीत त्यांची नक्कल करणं टेलिव्हिजन विश्वातील एका सेलिब्रिटी कपलला मात्र महागात पडल्याचं पाहायला मिळत आहे. ते सेलिब्रिटी कपल म्हणजे पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा.
‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वात या दोघांचे सूत जुळले आणि मग सोशल मीडियावरही त्यांच्या प्रेमाचे वारे वाहत असल्याचं पाहायला मिळालं. हे वारे इतके सोसाट्याने वाहिले की, पुनीश आणि बंदगीने एका फोटोसाठी थेट विराट आणि अनुष्काच्याच पोझची नक्कल केली. काही दिवसांपूर्वी अनुष्काने ज्याप्रमाणे विराटसोबतचा एक सुरेख फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता, त्याचप्रमाणे पुनीशनेही अगदी तसाच फोटो पोस्ट केला. पण, हा फोटो पोस्ट करणं त्याला महागात पडलं असंच म्हणावं लागेल.
वाचा : विराटनं भेट दिलेली बॅट घेऊन ‘ती’ पोहोचली भारतात
‘विरुष्का’च्या फोटोची नक्कल केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली. ही पोझ काही त्यांना जमलेली नाही, अशा प्रतिक्रियाही काहीजणांनी दिल्या. तर आधी लग्न करा आणि मग असे फोटो पोस्ट करा असंही एका युजरने म्हटलं. त्यामुळे यापुढे कोणाच्या फोटोची नक्कल करतेवेळी टेलिव्हिजन विश्वातलं हे कपल दोनदा विचार करुन मगच असे फोटो पोस्ट करेल असं म्हणायला हरकत नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2018 9:44 am