दूरदर्शनने लॉकडाउनमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी ८० आणि ९०च्या दशकातील काही हिट मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली आहे. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिकांनंतर लहान मुलांसाठी त्यावेळच्या सुपरहिट मालिका ‘शक्तिमान’ आणि ‘द जंगल बुक’ पुन्हा प्रदर्शित करण्यात आल्या. पण जंगल बुकचा पहिलाच भाग प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करण्यामागचे कारण म्हणजे जंगल बुक मालिकेचे शिर्षक गीत ‘जंगल जंगल बात चली है पता चला है’ हे दाखवण्यात येत नाही. तसेच मालिका पुन्हा डब करुन दाखवली जात आहे असे अनेकांनी म्हटले आहे. पण या मालिकेतील हा बदल प्रेक्षकांना आवडला नाही. त्यांनी सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

एका यूजरने ‘मालिकेतील जंगल जंगल बात चली है पता चला है हे गाणे कुठे आहे… हे गाणे मालिकेचा आत्मा आहे. कृपया तुम्ही ते दाखवा’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने मालिकेचे टायटल साँग का वाजवले जात नाही? कृपया ते लावा असे म्हटले आहे.

९०च्या दशकात सर्वात जास्त गाजलेली कार्टून मालिका म्हणजे ‘जंगल बुक.’ ही मालिका ५२ भागांची होती. दर रविवारी ही मालिका लागायची. त्या वेळी कार्टून व इतर मालिकांचा रतीब घातला जात नसे. म्हणून भारतात १९८९ मध्ये प्रसिद्ध झालेले जंगल बुक १९९४ पर्यंत चालू राहिले. या मालिकेचे शिर्षक गीत‘जंगल जंगल बात चली है’ हे गुलजार यांनी लिहिलेले होते. तर विशाल भारद्वाज यांनी गाण्याला संगीत दिले होते. मध्ये अनेक वर्षांचा गॅप होऊनही आजही अनेकांना हे गाणे पाठ आहे, तर काहीजण या गाण्याची मोबाइल रिंगटोनही ठेवताना दिसत आहेत. पण मालिकेत हे गाणे दाखवत नसल्यामुळे सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The jungle book mowgli show reruns without original song fans disappointed avb
First published on: 10-04-2020 at 10:58 IST