News Flash

कपिलने मुलीविषयी केला खुलासा; हिंदी नव्हे तर ‘या’ भाषेत देते उत्तर

आम्ही घरी हिंदी, इंग्लिश बोलतो पण अनायरा...

सध्याच्या काळात कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजे स्टारकिड्सची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतं. यात सैफ-करीनाचा लेक, महेंद्रसिंग धोनीची लेक हे स्टारकिड्स साऱ्यांनाच ठावूक आहेत. विशेष म्हणजे लहान वयातच ही मुलं प्रसारमाध्यमांना सामोरं बिंधास्तपणे जातात. त्यामुळे त्यांची चर्चा होते. मात्र, सध्या चर्चा रंगली आहे ती विनोदवीर कपिल शर्मा याच्या लेकीची.

अलिकडेच झालेल्या ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये क्रिकेटपटू सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांका यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्याशी गप्पा मारत असताना कपिलच्या मुलीचा म्हणजेच अनायराचा विषय निघाला. विशेष म्हणजे यावेळी अनायराबद्दल बोलत असताना कपिलने एक खुलासा केला. माझ्या मुलीला बंगाली भाषा लवकर समजते असं तो म्हणाला.

“घरी आम्ही सगळेच जण हिंदी, पंजाबी किंवा इंग्लिशमध्ये बोलतो. पण माझी मुलगी बंगाली भाषेत बोलल्यावर पटकन प्रतिक्रिया देते. आम्ही तिच्याशी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोललो की ती उत्तर देत नाही. मात्र, बंगालीमध्ये बोललो की ती लगेच उत्तर देते, असं कपिल म्हणाला.
पुढे तो म्हणतो, खरं तर आपण ज्यांच्या सहवासात अधिक राहतो तिच भाषा आपण पटकन आत्मसात करतो. हेच अनायराच्या बाबतीत होतंय. तिला सांभाळणाऱ्या नॅनी या बंगाली असून त्या अनायराशी बंगाली भाषेत बोलतात. त्यामुळे तिला पटकन बंगाली बोललेलं समजतं”.

दरम्यान,कपिल शर्माच्या मुलीचा जन्म डिसेंबर २०१९ ला झाला असून रोजी कपिल बऱ्याचवेळा त्याच्या मुलीसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 5:49 pm

Web Title: the kapil sharma show kapil daughter anayra respond bengali language dcp 98
Next Stories
1 बिग बींनी शेअर केला अभिषेकसोबतचा फोटो; म्हणाले…
2 निक्की तांबोळीने पँटमध्ये लपवला मास्क; भडकलेल्या नेटकऱ्यांनी घेतला समाचार
3 “पेंग्विनसारखा दिसतो तर पेंग्विनच म्हणणार आणि पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना”
Just Now!
X