20 January 2019

News Flash

Valentine’s Day 2018: आमिर म्हणतो व्हॅलेंटाइनला हे गाणं ऐकाच

हे गाणं आमिरचं सर्वात आवडतं गाणं

आमिर खान

जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून १४ फेब्रुवारीकडे पाहिले जाते. आज तरुण- तरुणी त्यांच्या मनातील भावना प्रिय व्यक्तीला बोलून दाखवतात. आजच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काही ना काही भेटवस्तू देतात. मग ते एखादं गुलाबाचं फूल असेल किंवा एखादं पत्र. प्रत्येक व्यक्ती आज त्यांच्या मनातील भावनांना वाट करुन देतात. पण हे तर झाले सर्वसामान्यांचे. या दिवशी बॉलिवूड स्टार काय करत असतील याचे कुतूहलही अनेकांना असते. चला तर मग आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा दोन सुपरस्टार्स कशा पद्धतीने व्हॅलेंटाइन डे साजरा करत आहेत ते सांगणार आहोत.

आमिर खानने त्याच्या करिअरमध्ये अनेक रोमँटिक सिनेमांत काम केले आहे. आमिरच्या करिअरची सुरूवातच कयामत से कयामत तक या प्रेमपटातून झालेली. या सिनेमानंतर आमिरने अनेक प्रेमपटात काम केले. पण आता त्याने ‘व्हॅलेंटाइन डे’ सेलिब्रेट करण्यासाठी त्याच्याच जो जीता वही सिकंदर सिनेमातील पहला नशा या गाण्याची निवड केली आहे. आमिरने ट्विट करत म्हटले की, ‘मित्रांनो, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी मी पहला नशा हे गाणे ऐकत आहे. या दिवसासाठी हे उत्तम गाणं आहे. माझ्या आवडत्या गाण्यांपैकी हे एक आहे. तुम्हा सर्वांना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा.’

आमिर खाननंतर बॉलिवूडचा दबंग खान सलमाननेही अनोख्या पद्धतीने त्यांच्या चाहत्यांना ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानने आयुष शर्माच्या आगामी सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. सोशल मीडियावर ‘लव्हरात्री’चे पहिले पोस्टर शेअर करताना सगळ्यांनाच या प्रेमाच्या दिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमारनेही त्याच्या पॅडमॅन सिनेमाची मदत घेत ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने गर्लफ्रेंडला कँडी आणि चॉकलेट्स विकत घेताना तिच्यासाठी पॅड घेणंही विसरू नका. ‘पद्मावत’ स्टार दीपिकाने सोशल मीडियावर गुलाबाचा फोटो शेअर केला आहे. पण या फोटोला तिने कोणतेही कॅप्शन दिलेले नाही, आयुषमान खुरानाने त्याने लिहिलेल्या काही ओळींसोबत चाहत्यांना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

First Published on February 14, 2018 1:52 pm

Web Title: this how aamir khan salman khan akshay kumar and other bollywood celebrities are celebrating valentine day