24 February 2021

News Flash

VIDEO : दीपिकाच्या ‘घुमर’ला टक्कर देतेय ही चिमुकली पद्मावती

या चिमुकलीच्या घुमरची दीपिकावरही जादू चालल्याचे दिसते.

घुमर

सध्या सर्वत्र ‘पद्मावत’ चित्रपटाची जादू पाहावयास मिळवत आहे. ‘पद्मावत’चे पोस्टर्स प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये त्याविषयी उत्सुकता पाहावयास मिळत होती. ट्रेलरमधील दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूरच्या भूमिकांनी तर सर्वांनाच भुरळ पाडली होती. दीपिकाचं ‘घुमर’ नृत्य असो वा रणवीरचं तडाखेबाज ‘खलीबली’ गाणं असो अनेकांनी या गाण्यावर ताल धरल्याचं सोशल मीडियावर पाहावयास मिळतंय. ‘पद्मावत’मधील गाण्यावर सध्या अनेकांचेच पाय थिरकत आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये एक चिमुकली सर्वांचे लक्ष वेधतेय.

वाचा : गंमतीत म्हणायला हवे, ‘दीपिकानेच नाक कापले हो….’

राजस्थानी पारंपरिक नृत्य ‘घुमर’ करताना दीपिकाने चाहत्यांची मनं जिंकली. दीपिकाच्या चाहत्यांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. प्रसिद्ध ‘घुमर घाण्यावर ही चिमुकली ठेका धरत गोल गोल फिरताना दिसते. ‘दीपिका फर्स्ट डे फर्स्ट शो’ या फॅन पेजवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या नेटिझन्सनमध्ये या चिमुकलीच्या घुमरची प्रशंसा होत असतानाच दीपिकावरही तिची जादू चालल्याचे दिसते.

VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा

दीपिकाने स्वतः सुद्धा ट्विट करून त्या चिमुकलीच्या नृत्याची प्रशंसा केली. लहान मुलेही आपले चाहते असल्याचे पाहून या आघाडीच्या अभिनेत्रीने चिमुकलीचे आभार मानले. तसेच, तिच्या आयुष्यात सदैव आनंद नांदो यासाठी शुभेच्छाही दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 12:57 pm

Web Title: this video of a cute little girl matching deepika padukones steps from ghoomar is going viral
Next Stories
1 सलमान खानने रोवली मराठी चित्रपटाची मुहूर्तमेढ
2 गंमतीत म्हणायला हवे, ‘दीपिकानेच नाक कापले हो….’
3 ‘पद्मावत’च्या पारड्यात पहिला पुरस्कार, रणवीरने मारली बाजी
Just Now!
X