05 March 2021

News Flash

‘मुलगा हवा की मुलगी?’; करीनाने दिलं ‘हे’ उत्तर

सध्या करीनाची मुलाखत चर्चेत आली आहे

बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर खान लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यामुळे सध्या करीना तिच्या गरोदरपणातील काळ एन्जॉय करत आहे. विशेष म्हणजे या काळातही ती तिच्या फॅशनसेन्सकडे लक्ष देताना दिसून येते. त्यामुळे अनेकदा तिची चर्चा होते. सध्या सोशल मीडियावर करीनाची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत, मला मुलगी हवी आहे, असं करीना म्हणताना दिसत आहे.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असलेली करीनाची ही मुलाखत जुनी असून २०१६ मध्ये तिने ही दिली होती. तैमुरच्या वेळी गरोदर असताना करीनाने या मुलाखतीत मला मुलगी हवी असं म्हटलं होतं.

तुला मुलगा हवा की मुलगी? असा प्रश्न करीनाला विचारण्यात आला होता. त्यावर मुलगा असो किंवा मुलगी त्याने काय फरक पडणार आहे? मी मुलगी आहे त्यामुळे मला मुलगीच झालेली जास्त आवडेल. मी माझ्या आई-वडिलांसाठी एखाद्या मुलापेक्षा कमी नाही, असं करीना म्हणाली.
पुढे ती म्हणते, ज्यांना मुलगी ओझं वाटते त्यांना एकच सांगू इच्छिते, फक्त एक स्त्रीच अशी आहे जी दुसऱ्याला जन्म देते.

दरम्यान, करीना दुसऱ्यांदा आई होणार आहे. यापूर्वी तिला तैमुर हा मुलगा आहे. विशेष म्हणजे तैमुर हा सध्याच्या घडीला लोकप्रिय स्टारकिडपैकी एक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 3:03 pm

Web Title: throwback when kareena kapoor khan said that she would love to have a daughter dcp 98
Next Stories
1 अध्यात्मिक गुरुंनी माझ्यासोबत…,’आश्रम 2’मधील अभिनेत्रीचा खुलासा
2 छायाचित्रकारांना पाहताच घाबरली रश्मी; म्हणाली…
3 बिहारमध्ये एनडीएची सत्ता आल्यानंतर सोनू सूदने मांडलं परखड मत; म्हणाला…
Just Now!
X