News Flash

सेटवर असा साजरा झाला टायगरचा बर्थडे

टायगरला तर याची कल्पनाही नव्हती

टायगर श्रॉफ

बॉलिवूडचा ‘मुन्ना माइकल’आणि प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ चित्रपटसृष्टीत हळूहळू आपला जम बसवत आहे. ‘हिरोपंती’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या टायगर नव्या दमाचा अॅक्शन हिरोच्या रुपात आपली ओळख निर्माण करताना दिसत आहे. २ मार्च म्हणजे गुरुवारी टाइगर श्रॉफचा २७ वा वाढदिवस झाला. मात्र आगामी ‘मुन्ना माइकल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्यामुळे बर्थडे सेलिब्रेशनसाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणामुळे टायगर श्रॉफने धमाकेदार बर्थडे सेलिब्रेशनची तयारी केली नसली तरी त्याच्या चित्रपटाच्या टीमने मात्र सेलिब्रेशनची तयारी केली होती. सेटवरच केक मागवून त्यांनी टायगरचा बर्थडे साजरा केला. टायगरला तर माहितही नव्हते की त्याचा वाढदिवस अशा पद्धतीने सेटवर साजरा केला जाईल.

तर टायगरला त्याच्या आई- बाबांनीही वाढदिवसाची अनोखी भेटवस्तू दिली होती. टायगरच्या बर्थडे सेलिब्रेशनविषयी बोलताना आई आएशा म्हणाल्या की, त्याला सकाळी सहा वाजता चित्रीकरणासाठी जायचे होते. रात्री देखील टायगर आणि कृष्णा (टायगरची बहिण) चित्रीकरणातून उशीरा घरी आले. त्यामुळे आम्हाला रात्रीदेखील वाढदिवस साजरा करता आला नाही. टायगरला कोणती एखादी वस्तू भेट देणे फारच कठीण असल्याचे आएशा यांनी सांगितले होते. त्याचे राहणीमान अगदीच साधे आहे. त्याला डिझाइनिंगचे कपडे किंवा महागड्या गॅझेटची आवड नाही. त्यामुळेच त्याची आवड लक्षात घेऊन टायगरला भेटवस्तू देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

unnamed-1

unnamed-2

unnamed-3

unnamed

टायगरसाठी त्यांनी पॉप स्टार मायकल जॅक्सनचे चित्र खरेदी केले. जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विनय वैद्यने साकारलेल्या या चित्रामध्ये उर्जा आणि सकारात्मकतेची झलक पहायला मिळते असे त्या म्हणाल्या. ‘चांगल्या लोकांना वाचा आणि महान बना… हा विचार घेऊन टायगर नेहमी घराबाहेर पडत असतो. किंग ऑफ पॉप यांचा टायगरला आवडणारा हा संदेश देखील चित्रावर लिहिला असल्याचे त्यांनी सांगितले.

‘हिरोपंती’ आणि ‘बागी’सारखे दमदार चित्रपट दिल्यानंतर टायगर आता ‘मुन्ना मायकल’ या आगामी चित्रपटातून चित्रपटरसिकांचे मनोरंजन करणार आहे. जगप्रसिद्ध पॉपस्टार मायकल जॅक्सनचा चाहता असलेल्या टायगरने या चित्रपटात त्याच्या काही प्रसिद्ध ‘डान्स मूव्हज्’ साकारण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2017 9:41 pm

Web Title: tiger shroff celebrates his birthday on the sets of munna michael
Next Stories
1 शामक दावरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
2 ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ ५ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
3 धनुष, हंसिका, अनिरुद्धचे खासगी फोटो व्हायरल
Just Now!
X