01 October 2020

News Flash

Video : स्थलांतरितांना घरी पोहोचवण्याचं काम कधीपर्यंत सुरू ठेवणार? सोनू सूद म्हणतो..

पाहा त्याची पूर्ण मुलाखत..

सोनू सूद

लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याचं काम अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून नि:स्वार्थपणे करत आहे. सोनू सूदच्या या कामाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. “ज्या लोकांनी आपली घरं, आपले रस्ते, आपले ऑफिस बांधले, त्यांना असंच सोडू नाही शकत असं मला वाटलं. त्यामुळे मी त्यांना घरी पोहोचवण्यासाठी व्यवस्था करू लागलो. हे माझं कर्तव्य आहे आणि हे काम करताना मी फार खूश आहे,” अशी प्रतिक्रिया त्याने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिली.

सोनू सूदचे मित्र-मैत्रीण, कुटुंबीय त्याला या कामात मदत करत आहेत. त्याची एक संपूर्ण टीमच स्थलांतरितांसाठी बसेसची व्यवस्था करण्यासाठी काम करतेय. स्वत: सोनू या मजुरांना भेटतो आणि त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्थाही करतो. या सर्व मदतकार्यामुळे पडद्यावर क्रूर खलनायक साकारणारा सोनू सूद आता खऱ्या आयुष्यात ‘हिरो’ बनला आहे.

पाहा तो काय म्हणाला…

हे मदतकार्य सुरू करण्यामागे आईची प्रेरणा असल्याचं तो सांगतो. त्याचसोबत स्थलांतरित मजुरांना कधीपर्यंत मदत करणार याचंही उत्तर त्याने या मुलाखतीत दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 9:37 am

Web Title: till when sonu sood will help migrants to reach their home here is his answer ssv 92
Next Stories
1 हिरो नव्हे सुपरहिरो; केरळमध्ये अडकलेल्या महिलांना सोनू सूदने केली अशी मदत
2 ‘अक्षय कुमार साकारणार सोनू सूदची भूमिका’; दिग्दर्शकाच्या मेसेजवर सोनूचा रिप्लाय, म्हणाला…
3 यूटय़ूबवर ‘वी आर वन’ जागतिक चित्रपट महोत्सव
Just Now!
X