News Flash

समंथाचा जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर चाहते घायाळ

विक्की कौशलमुळे समंथावर आली ही वेळ

टॉलिवूड अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. अभिनयासोबतच समंथा तिच्या ग्लॅमरस फोटोमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते.

समंथाने नुकताच एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडीओला चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय. समंथाने सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या ‘डोन्ट रश’ चॅलेंजमध्ये भाग घेत हा व्हिडीओ शेअर केलाय. डिजिटल कंटेंट क्रिएटर अनुषा स्वामी हिच्यासोबत समंथाने जबरदस्त डान्स केल्याचं या व्हिडीओत पहायला मिळतंय.

समंथाने तिच्या डान्सचा व्हिडीओ पोस्ट करताना कमेंटमध्ये विक्की कौशलचा उल्लेख केलाय. ” विक्की कौशलने आम्हाला हे करण्यास भाग पाडलं” असं तिने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे. त्याचसोबत तिने डान्स पार्टनर असलेल्या अनुषाचंही कौतुक केलंय. ” या उत्कृष्ट महिलेसाठी एक मोठा सलाम ..मला एक वर्ष दे, मी तू जशी आहेस तशी बनते बघ” असं समंथा म्हणाली आहे. काही दिवसांपूर्वीच विक्की कौशलने या चॅलेंजमध्ये भाग घेत त्याच्या टीमसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

दिया मिर्झा, रकुल प्रित यांच्यासह अनेक बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटींनी समंथाचं कौतुक केलंय. तर अनेक चाहत्यांनी समंथाच्या डान्सला पसंती दिलीयं. समंथाच्या या व्हिडीओला 13 लाखांहून अधिक लाईक मिळाले आहेत. समंथा फिटनेस प्रेमी असून बऱ्याचदा वर्कआउटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

2017 सालात समंथाने अभिनेता नागा चैतन्या याच्याशी विवाह केला आहे. ती लोकप्रिय अभिनेता नागार्जुन यांची सून आहे. समंथाने अनेक तेलगू आणि तमिळ सिनेमांमधून चाहत्यांची मनं जिकंली आहेत. ‘फॅमिली मॅम-2’ या वेब सीरिजमधून समंथा हिंदी अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 5:57 pm

Web Title: tollywood actress samantha akkineni shares video of dont rush challenge on instagram goes viral kpw 89
Next Stories
1 बिग बींनी शेअर केला खास फोटो, “दररोज महिला दिन”
2 जागतिक महिला दिवस : रश्मी आगडेकरने केला असा साजरी
3 सात बाई सात… बायका सात!, झिम्मा’चा धमाल टीझर रिलीज
Just Now!
X